शहरात पुन्हा दोघींच्या
सोनसाखळ्या ओरबाडल्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : सोमवारी (ता. ११) सिडकोत दोघींना लक्ष्य करीत त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याचा प्रकार घडला असतानाच, बुधवारी (ता. १३) पुन्हा दोघींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडल्याच्या घटना घडल्या आहेत. यात २ लाख दहा हजारांचे दागिने बळजबरीने खेचून नेले आहेत.
संभाजीनगर रोडवरील इंदू लॉन्ससमोर महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या भामट्याने खेचून नेली. रंजना गोविंद सोनवणे (४६, रा. सिन्नर) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १३) त्या संभाजीनगर रोडवरील इंदू लॉन्स येथे विवाह सोहळ्यासाठी आल्या असता, रात्री आठच्या सुमारास त्या रस्त्यालगत थांबलेल्या होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी एकाने त्यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजारांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून, उपनिरीक्षक घोडे हे तपास करीत आहेत. तर, चेतनानगर येथे पादचारी ७२ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी ओरबाडून नेल्याचा प्रकार घडला. विमल सुभाष धारणकर (७२, रा. चेतनानगर) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १३) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या चेतनानगरमधील चेतना प्राइड इमारतीजवळ असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ८५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून ओरबाडून नेल्याचा प्रकार घडला. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार पगारे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.