नाशिक

संत मुक्ताबाई तिरोभूतनिमित्त भजन, कीर्तनाची मांदीयाळी

CD
NSK26H19220 जळगाव : श्री संत मुक्ताबाई तिरोभूत सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित कार्यक्रमात कीर्तन सेवेत सहभागी महाराज व त्यांचे सहकारी. ------ संत मुक्ताबाई तिरोभूतनिमित्त रंगले कीर्तन उपशीर्षक जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे आयोजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : श्रीराम मंदिर संस्थान विद्यमाने श्री संत मुक्ताबाई पादुका मंदिर (मेहरुण) येथे श्री संत मुक्ताबाई यांच्या तिरोभूत (पुण्यतिथी) निमित्त भजन, कीर्तनादी कार्यक्रम पार पडले. जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथे संस्थानच्या वतीने श्री संत मुक्ताबाईंची ७२९ वी पुण्यतिथी वैशाख वद्य दशमी, अर्थात मंगळवारी (ता.१२) साजरी करण्यात आली. पहाटे ५ ते ७ श्रीराम मंदिरात श्री संत मुक्ताईंच्या प्रासादिक पादुकांवर चंद्रभागा, गोदावरी, मेहुण येथून तापी- पूर्णा संगम तसेच गिरणा या पवित्र जलाने महाभिषेक करण्यात आला. मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानाजवळील श्री सद्‌गुरू अप्पामहाराजांना आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंचा दृष्टांत झाला, त्या पवित्र स्थळी संत मुक्ताबाई पादुका मंदिर येथे विविध कार्यक्रम झाले. १४-१ असे झालेत कार्यक्रम सकाळी ८ ते ९ या वेळात गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्याहस्ते पूजन, अभिषेक होऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त प्रस्थान होणाऱ्या श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे टपाल, पत्रिका पूजन झाले. वारकरी ह.भ.प. श्रीराम महाराज जळगावकर यांची ‘धन्य ते संसारी. दयावंत ते अंतरी’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तनसेवा झाली. श्रीराम मंदिरात सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान सामुदायिक श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ, भजन, श्रीरामरक्षा स्तोत्र पठण होऊन, सायंकाळी आरती व नंतर भजन, कीर्तनादी सेवा झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी मेहरुण येथील श्रीराम भजनी मंडळाने परिश्रम घेतले. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT