नाशिक

ॲंकर

CD
जिल्हा टुडे पान चारसाठी ॲंकर --- NSK26H19204 जळगाव : वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत वाढत्या अपघातांवर चर्चा करताना जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे. --- वाढत्या अपघातांवर पोलिस विभागाचा कृती आराखडा ट्रक-ट्रॅक्टर चालकांना मिळणार वाहतूक प्रशिक्षण; हॉटेल चालकांना ''सीपीआर''चे धडे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रमुख रस्ते, राज्य महामार्गावर होणाऱ्या प्रांणातिक अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने पोलिस दलाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाहतूक शाखेतील कर्मचारी, अधिकारी आणि संपूर्ण जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी, अंमलदारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाची बैठक घेतली. जिल्‍हा पोलिस अधीक्षक धिवरे यांनी जिल्ह्यातील रस्ते, भौगोलिक परिस्थिती आणि त्या अनुषंगाने वार्षिक अपघातांची संख्या आदींची ठोस माहिती सोबत घेऊन आयोजित बैठकीत अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, कविता नेरकर, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी, वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच हायवे स्टेट पॅट्रोलचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील वाढत्या अपघातांची कारणे, मृत्यूंचे प्रमाण आणि त्यावरील उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली. मदतीचे ‘बॅकअप’ बैठकीत एमआयडीसी परिसरातील ट्रकचालकांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात येणार असून, गावागावांमधील ट्रॅक्टर चालकांनाही वाहतूक नियमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महामार्गालगतच्या ढाबे व हॉटेल चालकांना अपघातानंतर तातडीने मदत कशी करावी, ‘सीपीआर’सारखे प्राथमिक उपचार कसे द्यावेत, याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. चौकट अपघातस्थळांबाबत पाठपुरावा राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख रस्त्यांवरील धोकादायक ठिकाणांबाबत ‘न्हाई’ आणि ससार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लग्नसराईत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई, महामार्गावर साइडला उभ्या ट्रकवर दंडात्मक कारवाई तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. चौकट अपघातग्रस्तांना मदतीची यंत्रणा अपघातग्रस्तांना बहुतांश वेळा खासगी वाहनांतून हलविले जात असल्याचे निदर्शनास आल्याने वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यावरही भर देण्यात आला. प्रत्येक पोलिस वाहनात ‘फर्स्ट एड बॉक्स’ ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, जनजागृती मोहिमेलाही गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; पण रक्कम पाहून महिलांना बसला धक्का!

HBA Interest Rate: घर खरेदी-बांधणीसाठी स्वस्त कर्जाचा फायदा कायम! HBA व्याजदरात वाढ नाही; सरकारचा मोठा निर्णय

"आम्ही विभक्त होतोय" अखेर मौनी आणि सूरजने घटस्फोटावर सोडलं मौन ! पण नेटकऱ्यांनी धरलं या अभिनेत्रीला जबाबदार

Deglur Police : राजकीय व्यासपीठावरील शुभेच्छांचा फटका; देगलूरचे पोलीस निरीक्षक मुंडे बदली

Beed News: बीडमध्ये पंडित शिरले, क्षीरसागर चांगलेच तापले! नेमकं काय घडलं? बघाच..

SCROLL FOR NEXT