NSK26H19225
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जळगाव जिल्हा रुग्णालयातर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर.
-------------------
जागतिक परिचारिका दिनी
कलाविष्काराचे सादरीकरण
उपशीर्षक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक परिचारिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील केमिस्ट भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात परिचारिकांच्या आरोग्य सेवेमधील मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. यावेळी ब्रह्मकुमारी जळगाव शाखेच्या ब्रह्मकुमारी अश्विनी दीदी यांनी मार्गदर्शन करताना परिचारिकांची रुग्णसेवेमधील भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कविता, गीते तसेच नृत्य सादरीकरणातून परिचारिकांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. कार्यक्रमात उपस्थितांनी सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. या कार्यक्रमास उपअधिष्ठाता मारुती पोटे, उपअधिष्ठाता उमेश लाड, अधीक्षक योगिता बाविस्कर, अधिसेविका संगीता शिंदे, प्रा. डॉ. पुष्पेंद्र निकुंभ, डॉ. महादेव गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश कौसे, कोमल काळे, अविनाश गिरे व महेश घुले यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.