नाशिक

रखरखत्या उन्हापासून बचावासाठी त्रिमूर्ती चौक सिग्नलवर मंडप

CD
फोटो : B60259 सिग्नलवरील लाल दिवा आता सुसह्य उन्हाच्या तडाख्यावर त्रिमूर्ती चौकात ‘मंडप’चा उतारा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : शहरात कधी नव्हे ते कमाल तापमानाने ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेले असताना, या वाढत्या तापमानामुळे नाशिककर कमालीचे हैराण झाले आहेत. सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक सिग्नलवर उभारण्यात आलेल्या मंडपामुळे वाहनचालकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. भरदुपारी सिग्नलवर थांबावे लागणाऱ्या दुचाकीस्वारांसह रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना या मंडपामुळे रखरखत्या उन्हापासून संरक्षण मिळत आहे. काही दिवसांपासून नाशिक शहरात उन्हाचा चटका वाढला असून दुपारच्या वेळेत नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. कमाल तापमानही ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विशेषतः सिग्नलवर काही मिनिटे थांबावे लागणाऱ्या दुचाकीस्वारांना प्रखर उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन त्रिमूर्ती चौक सिग्नल परिसरात मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपामुळे वाहनचालकांना थेट उन्हापासून काही प्रमाणात बचाव मिळत असून पादचाऱ्यांनाही उभे राहण्यासाठी सावलीची सोय झाली आहे. दुपारच्या वेळेत या मंडपाचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत शहरातील इतर प्रमुख चौकांमध्येही अशाच प्रकारची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. वाहतूक कोंडी आणि उन्हाच्या तडाख्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी हा छोटासा उपक्रम दिलासादायक ठरत असून सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: आठवड्यात २ दिवस वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग आणि नो व्हेईकल डे... दिल्लीत सरकारचा मोठा निर्णय

शहनाज गिल पडली RCBच्या 'या' क्रिकेटरच्या प्रेमात? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणतात-

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ : मुंबई, लातूरची विजयी घोडदौड सुरू, अटीतटीच्‍या लढतीत पुण्याची नाशिकवर मात

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक पीक विमा परतावा

No Vehicle Day : पंतप्रधानांच्या आवाहनाला साद! महापौर शासकीय वाहन सोडून ई-स्कूटरने पोहोचल्या मनपात

SCROLL FOR NEXT