नाशिक

जळगाव शहरात अघोषीत लोड रिलीफ सूरू

CD
महावितरणचे स्केच वापरावे --- जळगावात अघोषित वीज कपातीचे संकट --- उपकेंद्रांवर ३० टक्के वाढला भार; खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमानात वाढ झाली आहे. पारा ४५ अंश पार गेला आहे. त्यामुळे शहरात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने शहरातील ‘महावितरण’च्या सर्व उपकेंद्रांवरील वीजभार वाढला असून, शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अघोषित वीज कपात करण्यात येत आहे. सोमवारी (ता. ११) रात्री नऊपासून तर रात्री तीनपर्यंत शहरातील काही भागात वीजपुरवठा दोन ते तीन तासांपेक्षा अधिक वेळ बंद करून यंत्रणा सुरळीत ठेवण्यात येत असल्याची माहिती ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील सर्वच भागात रात्री दहापासून विजेचा लपंडाव सुरू होत आहे. यात महाबळ, रायसोनीनगर, वाघनगर, जिजाऊनगर, कांचननगर, नवीपेठ, पोलन पेठ, शिवाजीनगर, निमखेडी, रिंगरोड, शाहूनगर, हुडको उपकेंद्रावरील पिंप्राळा कक्ष क्रमांक २ मधील हरिविठ्ठलनगर, श्‍यामनगर, जय हनुमाननगर, गणेश कॉलनी, पिंप्राळा परिसर आदी परिसरातील खंडित वीजपुरवठ्याचे सत्र रात्रीपर्यंत सुरू होते. २५० केव्हीचा भार वाढला जळगाव शहरात आठ ते नऊ उपकेंद्र असून, या उपकेंद्रांवरून रोहित्रांच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. मात्र, वाढत्या उष्णतेने घरांमध्ये २४ तास पंखे, कुलर तसेच, एसी सुरू असल्याने ३० टक्के विजेचा भार वाढला आहे. उन्हाळ्यात साधारण उपकेंद्रांवर १७० केव्हीपर्यंत विजेचा भार सुरू असतो. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून २५० केव्हीचा वीजभार वाढला आहे. या कारणामुळे समस्या महावितरणसोबत नोव्हेंबर २०११ मध्ये क्रॉम्प्टन कंपनीने करार केल्यानंतर शहरात वीजपुरवठा देण्याचे काम तीन वर्षे या कंपनीने केले. तीन वर्षांत शहरात वीजपुरवठा यंत्रणा या कंपनीने उभारली होती. नंतर ही कंपनी सोडून गेल्यानंतर महावितरणकडून नवीन यंत्रणाच उभी केली नाही. चौकट लोड रिलिफ म्हणजे काय शहरातील विविध उपकेंद्रांवर एकाच वेळी वीजभार वाढल्याने संपूर्ण वीजपुरवठा यंत्रणा बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही भागातील पुरवठा काही वेळासाठी बंद करणे. त्यानंतर तेथील वीजपुरवठा सुरळीत करून दुसऱ्या भागाचा बंद करणे करून वाढलेला वीजभार नियंत्रित करण्यासाठी ‘लोड रिलिफ’ करावे लागते. कोट तापमान प्रचंड वाढ झाल्याने शहरातील सर्वच उपकेंद्रावर एकाच वेळी वीजभार वाढत आहे. त्यामुळे लोड रिलिफ करून काही भागातील वीजपुरवठा बंद करून शहराचा वीजपुरवठा सुरळीत केला जात आहे. - दत्तात्रेय साळी, कार्यकारी अभियंता, जळगाव विभाग, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT