नाशिक

दुहेरी खून प्रकरणातील संशयित राहुल जगतापला जामीन

CD
दुहेरी खून प्रकरणातील संशयित राहुल जगतापला जामीन --- कापडणीस पिता-पुत्र खून खटला : मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस व त्यांच्या मुलाच्या खून प्रकरणी वर्ष २०२२ पासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असलेला मुख्य संशयित राहुल जगताप यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणातील तिघांना यापूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जुन्या पंडित कॉलनीत राहणाऱ्या कापडणीस पिता-पुत्राचा डिसेंबर २०२१ मध्ये पूर्वनियोजित कट रचून खून करण्यात आला होता. खून केल्यावर दोघांचे मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मोखाडा (जि. पालघर) परिसरातील निर्जनस्थळी टाकण्यात आले होते. सदरील गुन्हा उघडकीस आल्यावर पोलिसांनी मुख्य सूत्रधार संशयित राहुल गौतम जगताप, प्रदीप जगन्नाथ शिरसाठ, विकास हेमके आणि सूरज मोरे यांना २०२२ मध्ये अटक केली होती. या खटल्याची नियमित सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारवाडा पोलिसांनी एक हजार ६०० पानी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले असून, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे या खटल्यात सरकार पक्षातर्फे कामकाज पाहत आहेत. या गुन्ह्यातील संशयित मोरे याला सन २०२४, तर शिरसाठ व हेमके यांना २०२५ मध्ये सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. खुनातील इतर संशयितांना जामीन मिळाल्याने राहुल यालाही समानतेच्या तत्त्वावर जामीन मिळणे आवश्यक असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवून घेत त्यास सशर्त जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT