नाशिक

दरीआई माता वनक्षेत्रात भीषण वणवा

CD
अवतीभवती -- फोटो : H19240 दरीआई माता वनक्षेत्रात वणवा नाशिक : दरी येथील दरीआई माता देवस्थान व पर्यटनस्थळाच्या दरी डोंगर वनक्षेत्रात गुरुवारी (ता. १४) दुपारी वणवा पेटला. पिंपळ टेकडी आणि लोखंडे वस्तीसमोर लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोर आणि अन्य वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले. आगीमुळे वनसंपदेचे नुकसान झाले. मोरांसह जंगली ससे, घोरपड, दुर्मिळ सरडे, तितर, रानससे आणि विविध पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत. स्थानिक तरुण, शेतकरी व ‘राह फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी ओल्या बारदानाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी साडेसहापर्यंत अर्ध्या भागातील आग विझवण्यात यश आले. मात्र रात्री पुन्हा डोंगराजवळ आग भडकली. दरीआई माता वृक्षमित्र परिवार यांनी तत्काळ धाव घेऊन शर्थीचे प्रयत्न केले. दरीआई माता परिसरात हा चौथा वणवा आहे. हा वणवा मानवनिर्मित असल्याचा संशय असून, मुळाशी जाऊन चौकशी व्हावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT