नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त.....तळात बातमीची गरज लागल्यास कळवावे.....पाठवेल -- तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा धुळे : लग्नपत्रिकेत नाव टाकले नसल्याच्या कारणावरून चौघांनी तरुणावर हल्ला केल्याची घटना दोंडाईचा (ता. शिंदखेडा) शहरातील सालदारवाडी परिसरात घडली. दगड आणि फरशीने मारहाण झाल्याने दोघे जखमी झाले आहेत. ही घटना नऊ मेस रात्री साडेदहाच्या सुमारास दिलीप बडगुजर यांच्या घरासमोर घडली. फिर्यादी नितीन प्रकाश ठाकूर (वय २७, रा. रावलनगर, सालदारवाडी) याला संशयितांनी लग्नपत्रिकेत नाव का टाकले नाही, असा जाब विचारत वाद घातला. वाद वाढल्यानंतर प्रमोद संतोष सूर्यवंशी याने नितीन ठाकूर यांच्या डोक्यात दगडी फरशी मारली. त्यात तो जखमी झाला. फिर्यादीचा मित्र अतुल राजेंद्र जगदाळे याला अण्णा चौधरी आणि ओम कोळी यांनी दगडांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करण्यात आली. फिर्यादीनुसार प्रमोद संतोष सूर्यवंशी, हिरालाल संतोष सूर्यवंशी, अण्णा चौधरी (तिघे रा. रावल नगर, सालदारवाडी) आणि ओम कोळी यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. -- काकाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा धुळे : वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे सांगत दोघा पुतण्यांनी चुलत्याला शिवीगाळ व मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना वाल्हवे (ता. साक्री) येथे घडली. गावातील शेतकरी साहेबराव डोंगर गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार दहा मेस सकाळी सातच्या सुमारास साहेबराव हे शेतात जात असताना नारायण सुभाष गांगुर्डे व कालूसिंग सुभाष गांगुर्डे यांनी त्यांना रस्त्यात अडवत वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे सांगत शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केली. त्यांनतर घरी येत दोघांनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यावरून निजामपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -- गळफास घेतल्याने विवाहितेचा मृत्यू धुळे : कोंडाईबारी (ता. साक्री) येथे विवाहितेने गळफास घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पूजा वाघ (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पूजा वाघ यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी कन्हया वाघ यांच्यासोबत झाला होता. त्यांना आठ महिन्यांचा मुलगा आहे. दहा मेस रात्री पूजा यांनी कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर सर्व जण झोपी गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास बाळ भुकेमुळे रडू लागल्याने सासू खोलीत गेली. त्यावेळी पूजा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. सासूने आरडाओरड केल्यानंतर कन्हया वाघ व अन्य कुटुंबीयांनी धाव घेतली. पूजा वाघ यांना तत्काळ साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. -- कामपूरवा ४२ हजारांची शेतातील वायर लंपास धुळे : कामपूर (ता. शिंदखेडा) येथे शेतातील विहीर व कुपनलिकेची ४२ हजारांची वायर चोरट्यांनी लंपास केली. ही घटना १० ते ११ मेदरम्यान रात्री घडली. याबाबत शेतकरी विष्णू पाटील यांच्या तक्रारीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT