नाशिक

खुल्या प्लॉटधारकांना नोटीसा

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H19244 धुळे : प्रभाग-१० मध्ये सिव्हील हॉस्पीटलसमोरील बोळीत खुल्या प्लॉटधारकाला नोटीस देतांना स्वच्छता निरीक्षक विकास साळवे व कर्मचारी. --- आपापले खुले प्लॉट स्वच्छ करा --- महापालिकेतर्फे प्लॉटधारकांना नोटीसा; कारवाईचा इशारा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : शहरात ज्या- ज्या ठिकाणी खासगी रिकामे प्लॉट आहेत. अशा प्लॉट्सवर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, गवत, झाडे- झुडपे वाढले आहेत. पावसाळ्यात अशा प्लॉट्समुळे रोगराई होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्लॉटधारकांनी आपापले खुले प्लॉट स्वच्छ करावेत, अशा आशयाची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्लॉटधारकांना बजावण्याची माहीम सुरु करण्यात आली आहे. शहरातील खासगी खुल्या प्लॉट्सवर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व झाडे, गवत उगवले असल्याचे निदर्शनास आले आहे. येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शहरातील अशा खुल्या प्लॉट्सधारकांनी आपल्या जागेची स्वच्छता न केल्यास सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊन रोगराई होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत खासगी खुल्या प्लॉटधारकांना नोटीस बजावण्यात येत असून, नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत संपूर्ण प्लॉटच्या जागेची स्वच्छता करावी. संबंधित प्लॉटधारकाने स्वच्छता न केल्यास दंडात्मक कारवाई, भारतीय न्याय सहिंता कलम २७१, २७२, २८०, २९२ व २९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही नोटीशीतून देण्यात येत आहे. अशा प्रकारच्या नोटीसा शहरातील सर्व १९ प्रभागांमध्ये त्या-त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांच्यामार्फत बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी सर्व स्वच्छता निरीक्षकांना नोटिसांचे रजिस्टर देण्यात आले आहे. आयुक्त श्री. कापडणीस यांच्या निर्देशानुसार उपायुक्त मनोज वाघ यांनी दिलेल्या कृती आराखड्याप्रमाणे व मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, सर्व स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्याद्वारे ही कार्यवाही सुरु आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT