नाशिक

स्व-गणनेचा आज अंतिम दिवस : प्रसाद

CD
स्वगणनेचा आज अंतिम दिवस उद्यापासून दुसरा टप्पा; जिल्ह्यात ३८ हजार ७७ नागरिकांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : जिल्ह्यात स्वगणना उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३८ हजार ७७ नागरिकांनी नोंदणी पूर्ण केली आहे. स्वनोंदणीचा शुक्रवारी (ता. १५) अंतिम दिवस असून, अधिकाधिक नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. तसेच, येत्या काळात जनगणनेसाठी घरोघरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. केंद्र सरकारतर्फे जनगणना-२०२७ सुरू आहे. जनगणना ही देशातील सर्वांत मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय प्रक्रिया असून, या आकडेवारीच्या आधारेच केंद्र व राज्य सरकारांना विविध विकास योजना तयार करताना पायाभूत सुविधांचे नियोजन करणे शक्य होईल. जनगणनेच्या पहिला टप्प्यात १५ मेपर्यंत स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३८ हजार ७७ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत स्वगणना पूर्ण केली. दरम्यान, जनगणनेचा शनिवार (ता. १६)पासून दुसरा टप्पा सुरू होत आहे. हा टप्पा १४ जूनपर्यंत चालेल. या वेळी प्रगणक व पर्यवेक्षक प्रत्यक्ष घर गणनेसाठी येणार असून, त्यांना आवश्यक ती अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यात सात हजार ५५५ प्रगणक स्वगणनेत नागरिकांना https://se.census.gov.in या लिंकवर जाऊन स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. स्वगणनेत सहभागी होऊ न शकलेल्या नागरिकांची घरोघरी भेटी देऊन माहिती गोळा करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यात ३३ चार्ज अधिकारी असून, त्यांच्या अखत्यारीत एकूण सात हजार ५५५ प्रगणक, तसेच एक हजार २८८ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT