धुळे ः टुडे १ साठी, मेन
--
लोगो छाचाचित्र ः मनपा इमारत घेणे
--
पथदीप, पाणी, रस्त्यांप्रश्नी सत्ताधारीही नाराजच!
---
महापालिका स्थायी सभेत तक्रारी; प्रशासन धारेवर; सबस्टेशन्ससाठी जागेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : आमच्या प्रभागातील पथदीप बंद आहेत, ते सुरु करा. प्रभागातील बंद पथदीपांबाबत नागरिक आमच्याकडे तक्रारी करतात, आम्ही नगरसेवक अभियंत्यांकडे सविस्तर पत्त्यासह तक्रार करतो, मग महापालिकेकडून बंद पथदीपांबाबतची माहिती घेण्याची व्यवस्था नाही का, असे विविध प्रश्न महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातील सदस्यांनी स्थायी समिती सभेत उपस्थित केले. याशिवाय कचरा संकलन, पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजनेमुळे खोदलेल्या रस्त्यांचा प्रश्न आदी विविध विषयांवरही सत्ताधारी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
-----------
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा सकाळी अकराला महापालिकेत झाली. सभापती लताबाई पोतदार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. नगरोत्थान योजनेंतर्गत शहर हद्दीत इलेक्ट्रीक पोल्सला बोलार्डस् लावण्याकामी प्राप्त ९९ लाख ९४ हजार खर्चाची निविदा मंजूर करण्यात आली. तसेच प्रभाग एकमध्ये धनदाईनगर येथील सर्व्हे नंबर-२८ (३ व ४) येथील खुल्या जागेस तसेच वृंदावन कॉलनी येथील खुल्या जागेस संरक्षक भिंत बांधण्याचे विषय मंजूर करण्यात आले. सुलभ शौचालय साफसफाई व देखभाल दुरुस्तीच्या थकीत देयकांना प्रशासकीय मान्यतेचा विषय सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केल्याने तहकूब ठेवण्यात आला.
---
-
१४-१
मनपा प्रशासन धारेवर
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) पुनर्विनियोजन सन २०२५- २०२६ अंतर्गत धुळे शहर हद्दीत इलेक्ट्रीक पोल व एलईडी पथदीप लावण्यासाठी निविदा मंजूरीचा विषय होता. निविदा प्रक्रीयेत मे. समविल पॉवर ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. धुळे यांची एक कोटी ९९ लाख ९० हजार ३०५ रुपयांची (सर्वात कमी, शेकडा -०.०१ कमी) निविदा मंजूर करण्यात आली. या विषयाच्या अनुषंगाने सत्ताधारी भाजपसह विरोधी सदस्यांनी आपापल्या प्रभागातील बंद पथदीपांचा प्रश्न मांडत प्रशासनाला धारेवर धरले व पथदीप सुरु करा, अशी मागणी केली. प्रभाग १९ मधील एमआयएमचे नगरसेवक आमीर पठाण यांनी शंभर फुटी रोडवर अर्धे पथदीप बंद असल्याचे सांगत ते सुरू करा, अशी मागणी केली.
-
१४-१
तपासणी व्यवस्था कुठे?
सत्ताधारी भाजपचे सदस्य निलेश नेमाणे यांनी चितोड भागात पथदीप बंदसह पारिजात कॉलनीत रस्त्याच्या मधोमध विद्युत पोल असून त्यामुळे अपघात होत असल्याचा मुद्दा मांडला. भाजपच्या सदस्या वंदना भामरे यांनीही प्रभागातील बंद पथदीपांची नगरसेवकांना पत्त्यासह तक्रार करावी लागते. मग महापालिकेची त्याबाबत तपासणीची व्यवस्था नाही का अशी विचारणा केली. भाजपचे सदस्य विक्रम थोरात यांनीही प्रभागात अडीचशे-तीनशे पथदीप बंद असल्याचे सांगितले. भाजपचे अमोल मासुळे यांनी प्रभाग १७ मध्ये मिल परिसरात जुन्या वस्त्यांमध्ये तसेच इतरही भागात विद्युत पोल नाहीत. त्याची पाहणी करावी व विद्युत पोलसह एलईडी पथदीप उपलब्ध करावे, अशी मागणी केली. सदस्यांच्या या प्रश्नांवर विद्युत विभागाच्या अभियंत्यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तसेच एक जूनपासून नवीन कंत्राटदारामार्फत काम करणार असल्याचे सांगितले.
-
१४-१
...चौकट...
१४-१
नागरिकांची शिवीगाळ अन् कचऱ्याची समस्या
सदस्या श्रीमती भामरे यांनी तक्रार असेल त्या घरीच फक्त घंटागाडी जाते, जिथे कलेक्शन मिळते तिथेच घंटागाडी जाते, असा आरोप केला. भूयारी गटारसाठी रस्ते खोदले जातात मात्र ते दुरुस्त होत नाहीत. नागरिक आम्हाला मोबाईलवर शिवीगाळचे मेसेज करतात, असे म्हणत संताप व्यक्त केला. सदस्य पठाण यांनी चाळीसगावरोडवर कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट असल्याचे नमुद करत त्या भागासह शहरातील अशा भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अशी मागणी केली. भाजपचे सदस्य कृपेश नांद्रे यांनी प्रभागात कचरा संकलन करणारे माती भरतात व त्याचा व्हीडीओ आपल्याकडे असल्याचे सांगितले. संबंधित कर्मचाऱ्याने ठेकेदार ऐकत नाही, असे उत्तर दिल्याचेही त्यांनी नमूद केले. सदस्य नेमाणे यांनी प्रभागातील सोनार कॉलनीत आठ- आठ दिवस पाणी नसल्याचा मुद्दा पुन्हा मांडत नागरिक माझ्या घरी तक्रार घेऊन येतात असे सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.