नाशिक

उपवर्गीकरणाविरोधात नाशिकमध्ये उद्या मोर्चा

CD
उपवर्गीकरणाविरोधात नाशिकमध्ये उद्या मोर्चा एससी संघर्ष समिती : आरक्षणात फूट सहन करणार नाही सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भात राज्य सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या माध्यमातून कार्यवाही सुुरू केली आहे. त्याविरोेधात एससी आरक्षण उपवर्गीकरणविरोधी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीतर्फे शनिवारी (ता. १६) सकाळी ११ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला. एससी आरक्षण उपवर्गीकरणविरोधी संघर्ष समितीने गुरुवारी (ता. १४) पत्रकार परिषद घेत भूमिका विषद केली. या वेळी महाराष्ट्रात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरणाची कोणतीही गरज नाही. राज्यातील ५९ पैकी ५८ अनुसूचित जातींनी तशा प्रकारची मागणी केलेली नसल्याचा दावा करण्यात आला. तसेच उपवर्गीकरणासाठी आवश्यक अनुभवाधारित डेटाही शासनाकडे उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत जनगणनेपूर्वी अचूक लोकसंख्येची माहिती नसताना कोणताही निर्णय घेणे अयोग्य ठरेल, असे मत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. आरक्षण हा संविधानिक हक्क असून, त्यात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न समाजहिताच्या विरोधात आहे. अनुसूचित जातींचे सामाजिक व राजकीय ऐक्य अबाधित ठेवण्यासाठीचा हा लढा आहे. त्यादृष्टीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात विविध अनुसूचित जातींच्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी व महिला सहभागी होतील, अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली. याप्रसंगी राजन शिंदे, संतोष पगारे, राजरत्न पानपाटील, मिलिंद हाटे, राहुल जगताप, लक्ष्मीबाई ताठे, कांताराम जाधव, अरुण दोंदे, अर्जुन पगारे, प्रकाश पगारे, अनिल गांगुर्डे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Indian Army Soldier: देशसेवेचे व्रत अपुरेच राहिले! जावळीचा जवान तुषार भिलारेंची झुंज अपुरी ठरली, दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंब पोरके..

SCROLL FOR NEXT