नाशिक

मविप्रचे माजी संचालक ॲड. जी. एन. शिंदे यांचे निधन

CD
‘मविप्र’चे माजी संचालक ॲड. जी. एन. शिंदे यांचे निधन नाशिक, ता. १४ : विधी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत व ‘मविप्र’ संस्थेचे माजी संचालक ॲड. गंगाधर नारायण शिंदे (वय ८०) यांचे निधन झाले. मूळचे वणसगाव (ता. निफाड) येथील रहिवासी असलेल्या ॲड. शिंदे यांनी आपल्या कारकीर्दीत विविध क्षेत्रांत ठसा उमटवला. १९८४ आणि १९८७ अशा दोन कार्यकाळांत त्यांनी ‘मविप्र’ संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले. संस्थेच्या ध्येयधोरणांना दिशा देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांना सहकार क्षेत्राचा वारसा वडील नारायण शिंदे यांच्याकडून मिळाला. नारायण शिंदे यांनी काकासाहेब वाघ आणि माधवराव बोरस्ते यांच्याबरोबर निफाड कारखान्यावर २५ वर्षे संचालक म्हणून काम केले होते. हाच वारसा पुढे चालवत ॲड. शिंदे यांनी जिल्हा सहकारी बँकेचे वैयक्तिक गटातून संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. १९८९ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ विधीज्ञ बाबूराव ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये काम केले. विशेष गाजलेल्या खटल्यात ठाकरे यांचे सहकारी म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका विधी वर्तुळात आजही चर्चेत असते. माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे ते सासरे होत. NSK26H19249

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

SCROLL FOR NEXT