केरोसीन वितरणाची नव्या ठेकेदारावर जबाबदारी
---
जिल्हा पुरवठा विभाग : लाभार्थींची प्रतीक्षा संपुष्टात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : जिल्ह्यात केरोसीन वितरणासाठी पुरवठा विभागाने नव्याने ठेकेदार नेमला आहे. संबंधित ठेकेदारामार्फत लवकरच सर्व तालुक्यांना केरोसीनचे वाटप सुरू केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून केरोसीनच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थींची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.
मध्य-पूर्व आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसला पर्याय म्हणून सरकारने शिधापत्रिकाधारकांना केरोसीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधान्य व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मार्च व एप्रिलचे प्रत्येकी तीन लिटर याप्रमाणे एकूण सहा लिटर केरोसीन प्राधान्याने उपलब्ध करून द्यायचे आहे. राज्य सरकारने जिल्ह्यासाठी दोन लाख २८ हजार लिटरचा कोटा मंजूर केला. पुरवठा विभागातर्फे पहिल्या टप्प्यात येवला आणि पेठ या तालुक्यांंसाठी प्रत्येकी १२ हजार लिटरचे टँकर उपलब्ध करून दिले. मात्र, मनमाड डेपो ते तालुक्याच्या ठिकाणापर्यंत वाहतूक खर्च परवडत नसल्याने ठेकेदाराने वाहतुकीस असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे अन्य १३ तालुक्यांना केरोसीन पुरवठा वेळेत होऊ शकला नाही.
जिल्हा पुरवठा विभागाने सरतेशेवटी नवीन ठेकेदार शोधला आहे. संबंधित ठेकेदारामार्फत उर्वरित सर्वच तालुक्यांना लवकरच केरोसीनचा पुरवठा केला जाईल. त्यामुळे दीड महिन्यापासून केरोसीनच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थींना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.