नाशिक

महापौर आयुक्तांवर कडाडल्या

CD
महापौर आयुक्तांवर कडाडल्या जिथे पैसा तेथेच प्रशासनाला इंटरेस्ट; गंभीर आरोप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : महापालिकेतील भूसंपादनाची प्रकरणे, शहरातील विविध भूखंडांची माहिती याबाबत प्रशासनाने अडीच वर्षांत काहीच काम केले नाही. त्यामुळे जिथे पैसा तिथेच प्रशासनाला इंटरेस्ट असल्याचा गंभीर आरोप करीत महापौर दीपामाला काळे ह्या महापालिका आयुक्तांवर कडाडल्या. भूसंपादन व विविध विकासाच्या विषयांवरून महापौरांसह नगरसेवकांना महापालिका प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले. महापालिकेला नुकतेच अटलांटा कंपनीला ११ कोटी रूपये अदा करावे लागले. आता तत्कालीन अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महापालिकेला जवळपास २०० कोटी रूपयांची देणी द्यावी लागणार आहेत. अडीच वर्ष प्रशासनाने याबाबत काहीही भूमिका न घेतल्याने महापौर काळे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. भूसंपादनाच्या प्रकरणांत न्यायालयीन लढाई लढत असताना महापालिकेच्या वकीलांची बाजू कमकुवत राहिल्यामुळेच महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी अशीच परिस्थिती राहिल्यास आयुक्तांवर अविश्वास आणावा लागेल, असा सूचक इशारा दिला. विधी समिती बरखास्त करा : दीपक सूर्यवंशी ज्या विधी समितीमुळे महापालिकेला नुकसान सहन करावे लागत आहे, ती समिती बरखास्त करा, अशी मागणी दीपक सूर्यवंशी यांनी केली. नवीन सदस्यांची निवड करून समिती स्थापन करावी, असेही त्यांनी सांगितले. त्यावर महापौर काळे यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi: कोल्हापूरमध्ये मेस्सीसाठी असा जल्लोष? व्हिडिओ पाहून अर्जेंटिनियन चाहत्यांनी दिली भन्नाट प्रतिक्रिया VIDEO VIRAL

Discount Offer : लवकरच वाढणार iPhone 17 Pro Max ची किंमत! त्याआधी मिळतोय बंपर डिस्काउंट; खरेदीसाठी गर्दी, 'इथे' सुरुय ऑफर

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी - उद्धव ठाकरे

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

SCROLL FOR NEXT