नाशिक

सबस्टेशनसाठी मागणी

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 19250 धुळे : मनपा स्थायी सभेत वीज उपकेंद्राबाबत भूमिका मांडताना अमोल मासुळे. -- वीज उपकेंद्रास मनपाने जागा द्यावी - स्थायी सभेत मिल परिसरातील दगडफेकीच्या घटनेचे पडसाद सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : शहरातील विजेची वाढती मागणी आणि वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे उद्भवणारा जनक्षोभ लक्षात घेता महापालिकेने वीज उपकेंद्रांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत भाजपचे सदस्य अमोल मासुळे यांनी केली. मिल परिसरात बारा तास खंडित वीजपुरवठ्यामुळे मंगळवारी (ता. १२) मध्यरात्री झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा संदर्भ देत भविष्यातील अप्रिय घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षाही श्री. मासुळे यांच्यासह अन्य संबंधित सदस्यांनी केली. शहरातील मिल परिसरात मंगळवारी (ता. १२) तब्बल बारा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मध्यरात्री चक्करबर्डी येथील रामवाडी उपकेंद्रावर दगडफेक करत तोडफोड केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. सदस्य मासुळे यांनी हा मुद्दा उपस्थित करत महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. मिल परिसरात नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी महावितरण कंपनीने महापालिकेकडे जागेची मागणी करणारे पत्र दिले आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. - प्रशासनाच्या उत्तराने संताप नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पत्राबाबत ‘तपासून सांगतो,’ असे मोघम उत्तर दिल्याने श्री. मासुळे अधिकच संतप्त झाले. वीज महावितरणकंपनीने महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही का झाली नाही, असा सवाल श्री. मासुळे यांनी केला. विजेची वाढती गरज पाहता शहराच्या विविध भागात नवीन उपकेंद्रे उभारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. - पठाण यांची मागणी केवळ मिल परिसरच नव्हे, तर प्रभाग क्रमांक १९ मध्येही विजेची समस्या गंभीर होत चालली आहे. या भागातही नवीन उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी सदस्य पठाण यांनी लावून धरली. शहराचा विस्तार होत असताना पायाभूत सुविधांसाठी, विशेषतः वीज व्यवस्थेसाठी महापालिकेने समन्वयाने जागांचे नियोजन करावे, असा सूर सभेत उमटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT