नाशिक

शहर-जिल्ह्यात पोलिसांची सतर्कता

CD
पुणे बॉम्बप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस सतर्क संवेदनशील ठिकाणी गस्त वाढली; सीमावर्ती भागांत वाहनांची कसून तपासणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : पुण्यात जिवंत बॉम्ब आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि जिल्ह्यात पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, अतिसंवेदनशील ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणांवरही पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. पुण्यातील हडपसर परिसरात जिवंत बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकाने तो निष्क्रिय केल्यानंतर पुणेकरांनी सुटकेचा श्वास घेतला. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक पोलिसांनीही तातडीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. विशेषतः आर्टिलरी सेंटर, नोटप्रेस, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच श्री काळाराम मंदिर परिसरात अतिरिक्त गस्त घालण्यात येत आहे. शहर गुन्हेशाखेकडून विविध ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिसांनीही मालेगावसह संवेदनशील भागांत गस्त वाढविली आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांत वाहनांची कसून तपासणी केली जात असून, सार्वजनिक ठिकाणी स्थानिक पोलिस ठाण्यांकडून विशेष नजर ठेवण्यात येत आहे. कोट “शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये यासाठी पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. विशेषतः संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.” - किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT