नाशिक

पाण्याच्या कारणातून दोन गटात हाणामारी

CD
घोटाणे येथे पाणीवाटपावरून राडा लाकडी दांड्याने मारहाण; सात जणांवर गुन्हे दाखल नंदुरबार, ता. १५ : नंदुरबार, ता. १५ : तालुक्यातील घोटाणे गावात पिण्याच्या पाण्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रामचंद्र गोपीचंद धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या नवीन घराच्या बांधकामाला पाणी मारत असताना आरोपींनी ‘तुझ्या बापाचा नळ आहे का?’ असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच पाण्याची मोटार बंद करून रामचंद्र आणि त्यांच्या वडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या तक्रारीवरून विठोबा तुकाराम धनगर, नामदेव भटू धनगर, रूपला तुकाराम धनगर आणि तुकाराम आना धनगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक युवराजसिंग परदेशी या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या गटाकडून विठोबा तुकाराम धनगर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ग्रामपंचायतीने नळाला पाणी सोडलेले असताना रामचंद्र धनगर यांनी व्हॉल्व फिरवून घेतल्यामुळे गल्लीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. ‘लोकांना प्यायला पाणी नाही आणि तू घराला पाणी मारतोय,’ असे विचारल्याचा राग आल्याने रामचंद्र, गोपीचंद आणि भरत धनगर यांनी विठोबा व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी विठोबा यांना लोखंडी विळ्याच्या लाकडी दांड्याने दुखापत करण्यात आली. या तक्रारीवरून रामचंद्र गोपीचंद धनगर, गोपीचंद भाना धनगर आणि भरत गोपीचंद धनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे पुढील तपास करत आहेत. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ५०% कर्मचारी WFH वर, आठवड्यातून 2 दिवस Virtual Hearing; मोदींच्या आवाहनानंतर मोठा निर्णय

मुलासमोर नो टीव्ही पॉलिसी, आठ वाजता झोपायचं; गश्मीर महाजनीने मुलासाठी बनवलेत कडक नियम, शाळेत डब्बाही...

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

Maharashtra Latest News Live : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली, प्रवीण पडवळ यांची नियुक्ती

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

SCROLL FOR NEXT