नाशिक

रामदेववाडी शिवारात दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यु

CD
भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू --- जळगाव रस्त्यावरील रामदेववाडीतील घटना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : जळगाव- पाचोरा रस्त्यावरील रामदेववाडी शिवारात मंगळवारी (ता. १२) रात्री झालेल्या दुचाकी अपघातात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्‍वर चंद्रकांत सोनवणे (वय २७, रा. नागदुली, ता. एरंडोल) असे मृत तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्‍वर सोनवणे मंगळवारी (ता. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या दुचाकीने जात होता. रामदेववाडी शिवारातील जंगल भागात एका वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीने ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. रस्ता वळणाचा असतानाही समोरून येणाऱ्या दुचाकीचालकाने वेगाने विरुद्ध बाजूने वाहन चालविल्याने हा अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्‍वर सोनवणे याचा जागेवरच मृत्यू झाला. यात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, समोरील दुचाकीस्वार शुभम रवींद्र पाटील (रा. जवखेडा, ता. जळगाव) हाही जखमी झाला आहे. या प्रकरणी मृताचे काका महेंद्र तुकाराम सोनवणे (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत शुभम पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT