नाशिक

अंबोली-वेळुंजे वळण योजनेस ४९ कोटींची मंजुरी

CD
अंबोली-वेळुंजे वळण योजनेस ४९ कोटींची मंजुरी दमणगंगेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळणार; १६५ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने अंबोली-वेळुंजे प्रवाही वळण योजनेसाठी ४९ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे १६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीवरील नाल्यावर ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. भौगोलिक रचनेमुळे पश्चिमेकडे वाहून जाणारे ३२.०४ दशलक्ष घनफूट पाणी या प्रकल्पाद्वारे अडवून ते गोदावरीच्या पूर्ववाहिनी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. यातील ४.८३ दशलक्ष घनफूट पाणी स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित २७.२१ दशलक्ष घनफूट पाणी प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यात सोडण्यात येईल. निधीचे असे होणार वितरण मंजूर निधीपैकी ४६ कोटी रुपये प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामांवर खर्च करण्यात येणार आहेत, तर ३.२६ कोटी रुपये आनुषंगिक कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. भूसंपादनासाठी १३.४६ कोटी, बांधकामासाठी २४.३३ कोटी आणि पुलाच्या कामासाठी ३.९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दळणवळण सुविधांसाठी ३.७० कोटी, इमारतींसाठी ३२ लाख, वृक्षारोपणासाठी १५ लाख आणि देखभाल-दुरुस्तीसाठी १२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT