नाशिक

शहरातील २२ रोहित्रांवर अतिभार; उष्णतेमुळे वीज यंत्रणा तणावाखाली

CD
सेकंड मेन शहरातील २२ रोहित्रांवर अतिभार वीज यंत्रणा तणावाखाली; रात्री दोनपर्यंत ‘पीक लोड’; केबल जळण्याचे प्रकार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : प्रचंड उष्णतेमुळे शहरातील वीज वितरण यंत्रणेवरील ताण दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील तब्बल २० ते २२ वितरण रोहित्रांवर अतिभार आल्याचे समोर आले आहे. वाढत्या विजेच्या मागणीमुळे ट्रान्स्फॉर्मर ट्रीप होणे, केबल जळणे आणि वाहिन्यांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वाढल्या असून, शहरातील अनेक भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यंदा गतवर्षीपेक्षा उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेष म्हणजे, पूर्वी रात्री उशिरा विजेची मागणी कमी होत असे. मात्र गेल्या काही दिवसांत रात्री दोनपर्यंतही ‘पीक लोड’ कायम राहत असल्याने वीज यंत्रणेला विश्रांती मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मरचे तापमान वाढून ते जळण्याच्या घटना वाढत आहेत. महावितरणकडून उपाययोजना महावितरणने यावर उपाय म्हणून अतिभार (ओव्हरलोड) असलेल्या भागांतील भार इतर वाहिन्यांवर वर्ग करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच कमी क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर बदलून अधिक क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर बसविले जात आहेत. ६३ केव्हीएच्या जागी १०० केव्हीए तर १०० केव्हीएच्या जागी २०० केव्हीए ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात येत आहेत. तसेच उष्णतेमुळे उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्स्फॉर्मरचे तापमान धोकादायक पातळीवर पोहोचत असल्याने त्यांच्या भोवताली कुलर बसविण्यात आले आहेत. तसेच कमी क्षमतेच्या तारा बदलून एरियल बंच केबल टाकण्याचे कामही सुरू आहे. या आहेत अडचणी दरम्यान, नवीन ट्रान्स्फॉर्मर व खांब उभारताना काही भागांत नागरिकांकडून विरोध होत असल्याने कामांमध्ये अडथळे येत आहेत. तसेच एकाच वेळी अनेक ठिकाणी वीज वितरण यंत्रणेत बिघाड होत असल्याने रात्री दुरुस्तीच्या कामात अनेक अडचणी निर्माण होत आहे. तरीही स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वीज कर्मचाऱ्यांची कसरत दिवसभर उष्णतेमुळे लोखंडी वीज खांब ही रात्री १० पर्यंत तापलेले असतात. बिघाड झाल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तापलेल्या खांबावर चढून काम करावे लागते. तसेच दुपारी भर उन्हात देखील वीज यंत्रणा दुरुस्तीचे काम करताना वीज कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहेत. (ग्राफ करावा..) शहरातील महावितरणची वीजपुरवठा यंत्रणा - ३३ केव्ही क्षमतेची ११ उपकेंद्रे - ३२ पॉवर ट्रान्स्फॉर्मर - ११ उच्चदाब वाहिन्या - ७२ लघुदाब वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा - ३ हजार २७४ वितरण रोहित्र - २० ते २२ रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार - १५ दिवसांत शहरात १२ नवीन ट्रान्स्फॉर्मर कार्यान्वित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT