नाशिक

खासगी स्कूल व्हॅन फी मध्ये होणार वाढ

CD
जूनपासून पालकांच्या खिशाला कात्री जागतिक युद्धाचे सावट आणि इंधन दरवाढीचा चटका आता थेट शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला बसणार आहे. नाशिकसह शहरी भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने खासगी स्कूल व्हॅन, रिक्षा आणि बसचालकांनी दरवाढीचे संकेत दिले आहेत. यामुळे जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. इंधन दरवाढीसोबतच वाहनांचा देखभाल खर्चही वाढल्याने वाहतूकदारांपुढे पेच निर्माण झाला असून, प्रतिविद्यार्थी किमान २०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. *इंधन दरवाढ : घाऊक बाजारात डिझेल ३.११ रुपये आणि पेट्रोल ३.१४ रुपयांनी महागल्याने वाहतूक खर्चात वाढ *फीमध्ये वाढ : प्रतिविद्यार्थी शालेय बस किंवा व्हॅनच्या फीमध्ये किमान २०० रुपयांपासून वाढ होणार *अंतरावर आधारित शुल्क : घरापासून शाळेचे अंतर किती आहे, यानुसार वाहतूक शुल्काची पुनर्रचना होणार * गणित बिघडले : इंधनासोबतच विमा, स्पेअर पार्ट्स, देखभाल खर्च आणि चालकांचे मानधन वाढल्याने दरवाढ अपरिहार्य असल्याचे चालकांचे म्हणणे * पालकांवर आर्थिक भार : मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मासिक बजेटवर या दरवाढीचा थेट परिणाम होणार * समन्वयाची गरज : अनेक ठिकाणी पालक आणि चालक यांच्यात समन्वयाने फी ठरते, मात्र नव्या दरांमुळे वादाची चिन्हे * अवलंबित्व : बहुतांश विद्यार्थी खासगी व्हॅन, रिक्षा आणि मिनी बसवर अवलंबून असल्याने या निर्णयाचा मोठा परिणाम होणार ---कोट एप्रिल आणि मे महिना खूप कसरतीचा होता. पेट्रोल आणि गॅस मिळण्याचे वांदे झाले असून, पेट्रोल-डिझेल महागले आहे. त्यामुळे व्हॅनच्या फीमध्येही वाढ करावी लागणार आहे. दर विद्यार्थ्यांमागे किमान २०० रुपये वाढवले तरच सर्व खर्च निघणार आहे. -रवींद्र अस्वले, स्कूल व्हॅनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT