नाशिक

आजपासून प्रगणकांकडून गृहभेटी देवून ज

CD
टुडे चार ॲंकर ------- (जनगणनेसंदर्भात छायाचित्र वापरावे) जनगणनेचा दुसरा टप्पा; आजपासून प्रगणक येणार तुमच्या दारी गृहभेटी १४ जूनपर्यंत; खरी माहिती द्या; दिशाभूल करणे, नकार देणे बेकायदेशीर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : भारताची जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते. देशातील १६ वी जनगणना २०२७ अंतर्गत दोन टप्प्यात करण्यात येत आहे. यात पहिला टप्पा १ ते १५ मे नागरिकांनी स्वत:च्या मोबाईल ॲपवर अधिकृत वेबसाईटवर नोंदवलेली स्वगणना कालावधी संपुष्टात येत आहे. तर दुसरा टप्पा १६ मे ते १४ जून दरम्यान सुरू होत असून, प्रशासनपातळीवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांमार्फत गृहभेटीद्वारे घरगणना नोंदी करण्यात येत आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नियुक्त जनगणना कर्मचारी गृहभेटीस आल्यावर त्यांना योग्य आवश्यक ती माहिती द्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. घरगणना गृहभेटीअंतर्गत आलेल्या प्रगणकांना योग्य आणि आवश्यक ती माहिती नागरिकांनी द्यावी. चुकीची दिशाभूल करणारी माहिती देणे वा गंमत करणे किंवा नकार देणे चुकीचे आहे. जिल्ह्यात १५ तालुकास्तरासह १९ नगरपरिषद, महापालिका क्षेत्रात जनगणनेसाठी ७ हजार १६४ प्रगणक व १ हजार २२५ पर्यवेक्षक असे सुमारे ८ हजार ३८९ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्वगणना सरासरी ८७ टक्के नागरिकांना मोबाईल ॲपवर जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या मोबाइल क्रमांकावर नोंदणी करून ३४ प्रश्नांची उत्तरे ऑनलाइन भरता येतात. यामुळे प्रगणकांचा आणि नागरिकांचा वेळ वाचणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५ हजार ८७२ कुटुंबप्रमुख सरासरी ८७ टक्के माहिती स्वगणनेंतर्गत नोंदविण्यात आली आहे. ओटीपी देऊ नका प्रगणक कधीही नागरिकांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक खात्याची माहिती (ओटीपी) मागत नाहीत. गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका. या कार्यासाठी, ग्रामीण व शहरी भाग मिळून एकूण ८ हजार ३८९ प्रगणक व पर्यवेक्षक (राखीवसह) नियुक्त करण्यात आले आहेत. यात ३४ प्रश्नांची माहिती घेतली जाणार आहे. -------- चौकट वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित नागरिकांच्या सुविधेसाठी आजपर्यंत ''स्वगणना'' करण्याची संधी उपलब्ध होती. आता १६ मेपासून प्रगणक घरोघरी येऊन माहिती संकलित करतील. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने प्रगणकांना पूर्ण सहकार्य करून आपली अचूक माहिती नोंदवावी. जनगणनेत माहिती नाकारणे किंवा खोटी माहिती देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकाची वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय आहे, अशी माहिती जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT