नाशिक

संतप्त नागरिकांची मध्यरात्री वीज उपकेंद्रावर धडक

CD
मेन फिचर NSK26H19270 जळगाव : वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत हुडको पिंप्राळा वीज उपकेंद्रावर गुरूवारी रात्री संतप्त नागरिकांची झालेली गर्दी. ........ संतप्त नागरिक मध्यरात्री धडकले वीज उपकेंद्रावर सलग चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा विस्कळीत; फोन ‘नॉट रिचेबल’ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : शहरातील तापमानाचा पारा ४५ अंशांवर पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले असतानाच गेल्या चार दिवसांपासून रात्रीच्या वेळी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. रात्री नऊपासून पहाटेपर्यंत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे अनेक भागांतील नागरिकांना अक्षरशः जागून रात्र काढावी लागत आहे. त्यात ‘महावितरण’चे कर्मचारी फोन उचलत नसल्याने संतप्त नागरिक थेट वीज उपकेंद्रावर जावून धडक देत आहेत. जळगाव शहरात विशेषत श्‍यामनगर, हरिवीठ्ठल नगर, वाघनगर, जिजाऊ नगर, पिंप्राळा परिसरातील खंडेरावनगर, मयूर कॉलनी, हुडको, सोनीनगर, ओमपार्क नगर, गणपतीनगर, संत मीराबाई नगर, केदारनगर, निसर्ग कॉलनी, सेंट्रल बँक कॉलनी, विद्यानगर तसेच एसएमआयटी परिसरातील भिकमचंद जैन नगर आणि गुड्डू राजानगर या भागांत रात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक ठिकाणी तीन ते चार तास वीज नसल्याने घरातील उकाडा असह्य झाला होता. त्यामुळे काही नागरिकांनी घरांच्या छतावर तर काहींनी घराबाहेर बसून रात्र काढल्याचे चित्र दिसून आले. फोन नॉट रिचेबल वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी संबंधित उपकेंद्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वेळा फोन क्रमांक ‘नॉट रिचेबल’ लागत असल्याने ग्राहकांची अधिकच गैरसोय झाली. कर्मचाऱ्यांवर संताप दरम्यान, हुडको-पिंप्राळा वीज उपकेंद्रांतर्गत श्‍यामनगर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याने गुरूवारी नागरिकांचा संयम सुटला. जळालेले रोहित्र बदलवूनही समस्या कायम असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी मध्यरात्री पिंप्राळा-हुडको उपकेंद्रावर धडक दिली. श्‍याम नगरातील गट क्रमांक १२४ आणि १२५ मधील फ्यूज कर्मचारी बंद करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. रात्र डीपीजवळ यावेळी नागरिकांनी कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करून खंडित वीजपुरवठामुळे दररोज डीपीजवळ रात्र काढावी लागत आहे. वीजपुरवठा कधी सुरळीत करणार, याचे उत्तर मात्र कोणीच देत नसल्याने नागरिकांना यावेळी संताप व्यक्त केला. चौकट उपकेंद्रात पोलिस पथक हुडको उपकेंद्रात नागरिकांची गर्दी वाढत असल्‍याने महावितरणचे अधिकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे हे आले. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही उपकेंद्रावर येऊन महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. उपकेंद्र परिसरात मोठी गर्दी झाल्याने रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व संतप्त नागरिकांना शांत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT