संक्षिप्त
राज्य खो-खो स्पर्धेसाठी
२१ मेस निवड चाचणी
जळगाव : महाराष्ट्र खो- खो असोसिएशनच्या वतीने सोलापूर येथे आयोजित ५२ व्या कुमार/मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत जळगाव जिल्हा संघ सहभागी होत आहे. यासाठी संघ निवड चाचणी स्पर्धा २१ मेस आयोजित केली आहे. जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे मैदानावर सकाळी साडेसहाला स्पर्धा घेण्यात येणार आहे. निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा जन्म २५ ऑक्टोबर २००८ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक असून, खेळाडू ग्रॅज्युएशनच्या प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतलेला असावा. उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे प्रथम निवड चाचणी घेऊन त्यानंतर मूल्यांकन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
––––––––
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.