ही बातमी तापमानाच्या बातमीजवळ लावावी
---
विमानतळासमोर आढळला
मृतदेह; उष्माघाताचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम असून, तापमानाने ४४-४५ अंशांचा टप्पा गाठला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच जळगाव विमानतळासमोरील रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. उष्माघातामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
ही घटना गुरुवारी (ता. १४) उघडकीस आली. जळगाव ते कुसुंबा मार्गावरील विमानतळासमोर एक अनोळखी व्यक्ती रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. त्यानंतर कुसुंब्याचे पोलिस पाटील राधेश्याम चौधरी यांनी तत्काळ त्या व्यक्तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चौकट
भाजल्यासारख्या जखमा
प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या हाताला भाजल्यासारख्या जखमा आढळून आल्या आहेत. प्रचंड उष्णता आणि उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघात होऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मृताची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.