नाशिक

तापमान

CD
या बातमीजवळ उष्माघातसदृश बळी ही बातमी क्लब करावी -- जळगावात उष्णतेची लाट कायम (उपशीर्षक) तापमानात थोडी घसरण; पारा ४४ अंशांवर सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. १५ : जळगावात सलग तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ४५ अंशांवर आहे. यामुळे आज देखील उष्णतेची लाट कायम राहिली. तापमानात आज (ता.१५) एका अंशाने घसरण झाली असली तरी पारा ४४ अंशांच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. मागील आठवडाभरापासून जळगाव जिल्‍हा तीव्र उन्‍हाने तापला आहे. मे महिन्‍याच्‍या मध्‍यांतरात पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्‍या दरम्‍यान राहिला असल्‍याने आठवडाभरापासून वैशाख वणवा पेटल्‍याचा अनुभव जळगावकरांना येत आहे. गेल्‍या आठवड्याच्‍या सुरवातीपासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरवात केली होती. यानंतर पारा ४४ अंशावर जाऊन पोहोचला होता. तर गेल्‍या तीन दिवसांपासून तापमान ४५ अंशांवर राहिले असल्‍याने अंगाची लाहीलाही होऊ लागली होती. काही दिवस उष्‍णतेचा इशारा जळगावमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. रात्रीच्या वेळी देखील हवेतील उष्णता कमी होत नसल्याने उकाडा कायम आहे. दरम्‍यान, पुढील काही दिवस उष्णतेचा इशारा कायम असून, तापमानात फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. चौकट पावसाची शक्‍यता कमीच राज्‍यात १४ मेपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्‍यानुसार काही भागात पाऊस देखील झाला आहे. मात्र जळगाव जिल्‍ह्यात पावसाची शक्‍यता कमीच असल्‍याचे सांगितले जात आहे. ––––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT