नाशिक

जागतिक अनिश्चिततेच्या काळात जैन इरिगेशनची दमदार कामगिरी

CD
जागतिक अनिश्चिततेच्या काळात जैन इरिगेशनची दमदार कामगिरी उपशीर्षक चौथ्या तिमाहीतील परिणाम; भविष्यातही संधी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, पॉलिमरच्या वाढत्या किमती आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत भक्कम कामगिरी नोंदवली आहे. जैन हिल्स येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर चौथ्या तिमाहीचा निकाल जाहिर करण्यात आला. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत ‘हाय-टेक’ आणि ‘ॲग्रो प्रोसेसिंग’ विभागांच्या मजबूत कामगिरीमुळे कंपनीने वार्षिक तुलनेत ४.३ टक्के एकत्रित महसूल वाढ नोंदवली. प्रतिकूल परिस्थितीतही कंपनीने २३३ कोटी रुपयांची रोख निर्मिती केली असून, ती EBITDA च्या जवळपास ९७ टक्के इतकी आहे. कंपनीने एकत्रित महसुलात दुहेरी अंकी वाढ साध्य केली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मधील एकत्रित EBITDA ८०९ कोटी रुपये इतका असून, तो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १२.८ टक्क्यांनी अधिक आहे. ----- NSK26H19275 (अनिल जैन) कोट.. कच्च्या मालाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रवाहावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने यंदा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी धोरणांमधील सातत्य तसेच सिंचन आणि पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च यामुळे बाजारातील मागणीला चालना मिळेल असे अपेक्षित आहे. - अनिल जैन, व्यवस्थापकीय संचालक -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT