दोन कॉलम
सण, उत्सवांच्या पार्श्र्वभूमीवर
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी सण-उत्सव, थोर व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथींच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात आज (ता.१५) रात्री बारापासून तर २९ मेच्या मध्यरात्री १२ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी या कालावधीत जिल्ह्यात शस्त्रे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड किंवा तत्सम वस्तू जमा करणे, सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक घोषणा देणे, आक्षेपार्ह हावभाव करणे तसेच व्यक्तींच्या प्रतिमांचे दहन करणे यास बंदी घालण्यात आली आहे.
पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यासाठी पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार असून, विनापरवानगी सभा किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, हा आदेश शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ व अंत्ययात्रा यांना लागू नसून, तसेच कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही यातून सूट देण्यात आली आहे. हे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केले आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.