नाशिक

भुसावळात हॉटेलमालकावर हल्ला

CD
भुसावळात हॉटेल मालकावर ग्राहकांचा लोखंडी रॉडने हल्ला ---- बाजारपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. १५ : मटकीची उसळ खराब असल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाला शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना भुसावळ शहरातील भोळे पेट्रोलपंपाजवळील हॉटेल देवयानी येथे गुरुवारी (ता.१४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी साहील तडवी व त्याच्या दोन ते तीन साथीदारांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हर्षल बाळू पाटील (वय ४१ वर्षे, रा. देनानगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. ते भोळे पेट्रोलपंपाजवळ हॉटेल देवयानी नावाचे हॉटेल चालवितात. फिर्यादीनुसार बुधवारी (ता.१४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास साहील तडवी व त्याचे मित्र हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यांनी मटकीची उसळ मागविली होती. सुमारे तासाभरानंतर उसळ कडू लागत असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यावर हॉटेलमालकाने वेळेत सांगितले असते, तर उसळ बदलून दिली असती, असे सांगितल्याने संशयितांनी शिवीगाळ केली व बिल भरून रात्री नऊला तेथून निघून गेले. त्यानंतर रात्री सव्वादहाच्या सुमारास साहील तडवी व त्याच्यासोबत दोन ते तीन इसम पुन्हा हॉटेलवर आले. त्यांनी संगनमत करून हर्षल पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साहील तडवी याने लोखंडी रॉडने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व पाठीवर मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेले अर्जुन दौलतसिंग धुर्वे यांनाही संशयितांनी मारहाण केली. मोबाइलमध्ये व्हिडीओ का काढत आहे?, असे म्हणत त्यांचा मोबाइल हिसकावून जमिनीवर आपटून फोडण्यात आला. शिवाय चापटाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूसारखी वस्तू दाखवीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. जखमींना पोलिसांनी ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी पाठविले होते. पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT