सर्वसामान्यांचे बोल
---कोट
फोटो : H19277
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीची झळ सर्वसामान्यांना अधिक बसते. इंधनाच्या किमती वाढल्याने दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती आपोआप वाढतात. सध्या उन्हाळी सुटी, लग्नसराई असल्याने घरी पाहुणे येतात, पर्यटन होते. पर्यायाने हॉटेलिंग बाहेर खाणे होते. यामुळे वाढलेल्या खर्चाची झळ बसल्याने आर्थिक बजेट कोलमडते. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती स्थिर ठेवल्या तरच आर्थिक बजेट स्थिर राहते. अन्यथा खर्चांमध्ये कपात आणि काटकसर करावी लागते.
-सुनीता पाटील, गृहिणी
--------कोट
फोटो : H19278
पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यावर महिन्याचा खर्च वाढतो. त्यात शहरात सर्व ठिकाणी रस्ते खोदलेले असल्याने वाहनांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च भरमसाठ वाढलेला आहे. खराब रस्त्यांमुळे धुळीचे प्रमाण वाढल्याने घरात आरोग्यावरील खर्च वाढला आहे. इंधनाच्या किमती वाढतात, तेव्हा अनेक घटकांवर परिणाम होतो आणि त्याचा त्रास फक्त सर्वसामान्यांना होतो.
-स्मिता पाटील-खैरनार, नोकरदार
-------
फोटो : H19279
निवृत्तिवेतनावर घरखर्च भागवावा लागतो. इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहत नाही तर, संपूर्ण बाजारपेठेवर होतो. मालवाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला, दूध, गॅस तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू महाग होतात. नोकरी, शाळा किंवा व्यवसायासाठी रोज प्रवास करणाऱ्यांचा खर्च वाढतो. त्यामुळे घरातील इतर गरजांवर नियंत्रण ठेवावे लागते. कुटुंबांची बचत कमी होऊन आर्थिक ताण वाढतो.
रवींद्र दुसाने, निवृत्त कर्मचारी
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.