ताटातील घासही महागणार
इंधन दरवाढीचा भडका उडताच आता सर्वसामान्यांच्या ताटातील घासही महागणार असून, किराणा मालाच्या दरात किलोमागे ५ रुपयांपर्यंत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. वाहतूक खर्च वाढल्याने डाळी, तेल आणि साखरेचे भाव वधारणार असून, महागाईच्या या दुहेरी माऱ्यामुळे मध्यमवर्गीयांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. त्यातच भाजीपाला आणि फळेही महागणार असल्याने गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले असून, नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
----
*किराणा महागला : ट्रान्स्पोर्ट खर्च वाढल्याने डाळी, खाद्यतेल आणि साखरेच्या दरात प्रति किलो ४ ते ५ रुपयांची वाढ होणार.
*चौफेर फटका : इंधन दरवाढीमुळे केवळ किराणाच नव्हे, तर भाजीपाला आणि फळांच्या किमतीही कडाडण्याची शक्यता.
* महिला वर्गात चिंता : घराचे अर्थकारण सांभाळताना महिलांची तारेवरची कसरत; नव्या दरवाढीमुळे कौटुंबिक चिंतेत भर.
वाहतूकदारांचा निर्णय : इंधन कंपन्यांनी मध्यरात्रीपासून दर वाढवल्याने मालवाहतूकदारांनी भाडेवाढीची तयारी केली असून, ग्राहकांवर भार पडणार.
* वस्तूंमागे किलोला ४ ते ५ रुपये दरवाढीचा अंंदाज
--- कोट
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिर परिस्थितीमुळे सरकारला दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयामुळे किराणा मालाच्या वाहतूक दरात अपेक्षेनूसार वाढ होणार आहे. ते दर वाढल्याने नाइलाजास्तव आम्हालाही नाइलाजास्तव दर वाढीचा निर्णय घेणे भाग पडेल.
-प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, जिल्हा किराणा व्यापारी संघटना.
---
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.