नाशिक

महापालिका कर्मचार्यांना एप्रिलपासूनच वाढीव भत्ता

CD
महापालिका कर्मचाऱ्यांना एप्रिलपासूनच वाढीव भत्ता वैद्यकीय भत्त्यापोटी तीन हजार, फरकाची रक्‍कम येत्‍या वेतनात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : येथील महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मासिक वैद्यकीय भत्त्यात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्‍यामुळे आता कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्त्यापोटी तीन हजार रुपये प्रतिमहिना मिळणार आहे. १ एप्रिलपासून हे सुधारित दर लागू राहणार असल्‍याने फरकाची रक्‍कम कर्मचाऱ्यांना येत्‍या पगारातून अदा केली जाईल. महापौर हिमगौरी आडके यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी यासंदर्भातील घोषणा केली होती. शुक्रवारी (ता. १५) महापालिका आयुक्‍त मनिषा खत्री यांनी आदेश जारी करताना या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केला आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना ८ एप्रिल २००९ च्या आदेशानुसार दरमहिन्‍याला एक हजार रुपये वैद्यकीय भत्ता दिला जात होता. महासभा ठराव आणि आयुक्तांच्या मान्यतेनुसार यात दोन हजार रुपयांची वाढ करून, भत्ता तीन हजार रुपये केला आहे. सुधारित भत्ता यावर्षीच १ एप्रिलपासून लागू होणार आहे. हा भत्ता इतर कोणत्याही लाभासाठी लागू होणार नसल्‍याचे आदेशात स्‍पष्ट केले आहे. - इन्‍फोः ‘त्‍यांना’ मिळणार नाही लाभ.. बाह्ययंत्रणेने भरल्या जाणाऱ्या पदांना हा भत्ता लागू होणार नाही. नियमित वेतनश्रेणीत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच दोन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर हा भत्ता मिळेल. फिक्स-पे, रोजंदारी आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांना तो लागू होणार नाही. हा वाढीव खर्च विहित लेखाशीर्षाखाली मंजूर अनुदानातून भागवण्याच्या सूचना संबंधित विभागप्रमुखांना दिल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT