नाशिक

दवाखाना भूमिपूजन

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H19289 धुळे ः प्रभाग-१ मधील फॉरेस्ट कॉलनीत एनयूएचएमअंतर्गत नागरी आरोग्य केंद्राचे भूमिपूजन करताना महापौर मायादेवी परदेशी. शेजारी नगरसेवक ललित माळी, योगिता कुटे व परिसरातील रहिवासी. --- फॉरेस्ट कॉलनीत नागरी आरोग्य केंद्र महापौरांच्याहस्ते भूमिपूजन; नगरसेवक ललित माळी यांचा पाठपुरावा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ ः शहरातील प्रभाग-१ मधील फॉरेस्ट कॉलनीत शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी आरोग्य केंद्राचे महापौर मायादेवी परदेशी यांच्याहस्ते भूमिपूजन झाले. गेल्या ३०-४० वर्षांपासून या भागात दवाखान्याची प्रतीक्षा होती. आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक म्हणून केलेल्या कामाच्या पाठपुराव्याला यामुळे यश आल्याचे प्रभागातील नगरसेवक ललित माळी यांनी म्हटले आहे. धुळे शहराच्या उत्तरेकडील भागात वास्तव्यास असलेल्या सुमारे ५०-६० हजार नागरिकांना मागील ३०-४० वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा सोयीच्या अंतरावर उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आरोग्य सेवांसाठी दूर अंतरावर जावे लागत असल्याने सर्वसामान्य, गरीब व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या गंभीर समस्येची दखल घेत आपण गेल्या अनेक वर्षांपासून या भागात दवाखाना व्हावा, यासाठी पाठपुरावा करत होतो. धुळे शहराचे आमदार श्री. अग्रवाल यांनी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या अत्यंत महत्त्वाच्या मागणीस प्राधान्य देत नव्या नागरी आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी पाठबळ दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय पातळीवर आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला, असे नगरसेवक श्री. माळी यांनी म्हटले आहे. या कामासाठी नगरसेवक सुभाष जगताप, योगिता कुटे, उज्ज्वला भोसले, तसेच भाजपचे सरचिटणीस सुनील कपिल, अमोल मराठे, संदीप गुरव यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमुद केले आहे. महापौर श्रीमती परदेशी यांच्याहस्ते दवाखान्याचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी नगरसेवक श्री. माळी, फॉरेस्ट कॉलनीचे सचिव रवींद्र इंगळे, शिवाजी माळी, अरुण कलाल, दिलीप सुरशे, श्री. चौधरी, मयूर धात्रक, रुपेश सूर्यवंशी यांच्यासह महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. एनयूएचएमअंतर्गत होणाऱ्या या दवाखान्यात ओपीडी, रक्त तपासणी, औषध वितरण, माता व बाल आरोग्य सेवा, गर्भवती महिलांची तपासणी व मार्गदर्शन, लसीकरण, रक्तदाब व मधुमेह तपासणी, कुटुंब नियोजन सेवा, तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळेल असे नगरसेवक श्री. माळी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT