नाशिक

आई...मी मोठी चूक करतोय; म्हणत तरुणाची रेल्वेसमोर उडी

CD
NSK26H19311 (मृत गणेश सोनवणे) ........... ‘आई, मी मोठी चूक करतोय..’ अन् तरुणाची रेल्वेसमोर उडी बेपत्ता असलेल्या युवकाची जळगावात आत्महत्या सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५: तालुक्यातील नांद्रा येथील १९ वर्षीय तरुणाने जळगाव रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी (ता. १५) धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने आईला फोन केला आणि फोनवर ‘आई..मी मोठी चूक करतोय, असे फोनवर बोलत असताना त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि त्याच्या मृत्यूनंतरही तब्बल २३ मिनिटे कॉल सुरू असल्याने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार गणेश गुरुप्रसाद सोनवणे (रा. नांद्रा, ता. जळगाव) हा युवक गेल्या ३ मेपासून गावातील एका तरुणीसह बेपत्ता होता. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी गणेश जळगाव रेल्वेस्थानकावर उतरला. त्यानंतर तो शिवाजीनगरच्या दिशेने रेल्वे मार्गालगत गेला आणि त्याने आईशी संपर्क साधला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांकडून धमक्या मिळत असल्याने गणेशने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. फोनवर बोलताना घेतली उडी आईसोबत फोनवर बोलताना गणेश याने सुरुवातीला बहिणीबाबत विचारणा केली. त्यानंतर ‘मी मोठी चूक करत आहे,’ असे सांगत असतानाच रेल्वे खांबा क्रमांक ४२०/९ ते ४२०/११ दरम्यान धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले. या घडलेल्या प्रकारामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मृताचे कुटुंबीय व नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहोचले. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी प्रचंड आक्रोश केला. तरुणाच्या मृत्यूनंतर दक्षता म्हणून नांद्रा गावात पोलिस तैनात होते. घटनेनंतर मृताचे नातेवाईक व संबंधित तरुणीही पोलिस ठाण्यात पोहाचले होते. चौकट फोनवर आई देत होती आवाज... दरम्यान, मुलाचा फोन सुरू असल्याने आई सतत त्याला आवाज देत राहिली. मात्र दुसरीकडे गणेशचा मृत्यू झाला होता. ही संपूर्ण घटना कुटुंबीयांसाठी अत्यंत वेदनादायी ठरली. घटनेनंतर लोकोपायलटने रेल्वे प्रशासनाला माहिती दिल्यानंतर लोहमार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT