नाशिक

खा.श्रीकांत शिंदे सोमवारी नाशिक दौऱ्यावर

CD
खा. श्रीकांत शिंदे सोमवारी नाशिकमध्ये नाशिक : शिवसेना नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे हे सोमवारी (ता.१८) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या संदर्भात माहिती देताना लोकसभा संपर्कप्रमुख आमदार सुहास कांदे यांनी सांगितले की, ‘शिवसेना कार्यकर्ता संवाद दौऱ्यानिमित्ताने’ पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान श्रीकांत शिंदे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असून, जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेणार आहेत.तसेच, शहर व ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवासेना व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका, रणनीती आणि संघटनात्मक बळकटीकरण याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात येणार आहेत. या दौऱ्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळणार असून, शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणास मदत होईल. ‘एक गाडी, एक टीम, हरित प्रवास’ ही संकल्पना राबवून आपण पर्यावरणपूरक आणि जबाबदार नागरिकत्वाचा आदर्श निर्माण करू शकतो. या उपक्रमामुळे स्वच्छ, हरित आणि स्वावलंबी महाराष्ट्र घडविण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : गौतम गंभीर चूक सुधारणार, Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार! इंग्लंडविरुद्ध तगडी प्लेइंग इलेव्हन...

Lalitpur Silk Saree: बनारसी-कांजीवरमच्या गर्दीत हरवलेला बुंदेलखंडचा खजिना! ललितपूरची झरी सिल्क साडी का आहे खास?

Latest Marathi News Live Update : पुण्यात गव्यामुळे एकच खळबळ! कॅनलमध्ये अडकलेल्या गव्याला वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

Kolhapur BJP Corporator : कोल्हापुरात राजकीय भूकंप? भाजपच्या रिंकू देसाईंचे नगरसेवकपद धोक्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ; नेमकं काय घडलं?

Railway: मध्य रेल्वेकडून दिलासा! विठुरायाच्या दर्शनासाठी ५४ विशेष गाड्या; तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार? तारीख समोर, पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT