सामाजिक उपक्रमांतून वाढदिवस साजरा करा
मंत्री गिरीश महाजन; रक्तदान, वृक्षारोपण व रुग्णसेवेवर भर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा वाढदिवस येत्या रविवारी (ता. १७) साजरा होत असून, त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे औपचारिक स्वागत, सत्कार किंवा कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पुष्पगुच्छ, हार, शाल, होर्डिंग, बॅनर्स व पोस्टर्स यांवरील खर्च टाळावा, असेही त्यांनी नमूद केले. त्याऐवजी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रुग्णसेवा, दिव्यांगांना मदत तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यांसारखे विधायक सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले आहे.
‘समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे आणि गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण करणे, हाच माझ्यासाठी वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय पर्यावरणपूरक संदेश देताना पेट्रोल-डिझेल वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हा दिवस साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.