शहर --जिल्हा पान-२
-----------
३०-२
‘डीबीडी’ग्रुपतर्फे सिन्नर येथे
२२ ला चॅनेल पार्टनर्स मीट
---------------
दीपक बिल्डर्सतर्फे आयोजन ः नव्या प्रवासाची सुरुवात
-----------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १४ : नाशिकच्या प्रसिद्ध दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ग्रुपने सिन्नरमधील चॅनेल पार्टनर्ससाठी चॅनेल पार्टनर मीट आयोजित केली आहे. येत्या शुक्रवारी (ता.२२) सिन्नर सिटी सेंटर (पाचवा मजला, बँक्वेट हॉल) सिन्नर येथे सायंकाळी पाचला हा कार्यक्रम होणार आहे.
-------------
दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे म्हणाले,‘ सिन्नरची प्रगती आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत. सिन्नरमध्ये साई आनंद प्राइड ‘बी’ आणि सिन्नर सिटी सेंटर या दोन दर्जेदार व्यावसायिक प्रकल्पांसह आम्ही सिन्नरच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. डीबीडी ग्रुपतर्फे आयोजित हा भव्य स्नेहभेट सोहळा चॅनेल पार्टनर्ससाठी संधी आणि अनेक नव्या शक्यता घेऊन येणारा असेल. सर्व चॅनेल पार्टनर्सनी उपस्थित राहून या संधीचे सोने करावे.
दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गेल्या ३७ वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्रातील एक अग्रगण्य आणि विश्वासू नाव म्हणून सर्व परिचित आहेत. आजवर त्यांनी शंभराहून अधिक प्रकल्प यशस्वीपणे पूर्णत्वास नेऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. पाच हजारांहून अधिक कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर सुपूर्द करत त्यांनी हा विश्वास जपला आहे.
सिन्नरमध्ये डीबीडी ग्रुपचे साई आनंद प्राइड ‘बी’ आणि सिन्नर सिटी सेंटर हे दोन व्यावसायिक प्रकल्प असून शॉप्स, ऑफिस स्पेसेस आणि शोरूम्ससाठी येथे सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहेत. चॅनेल पार्टनर्ससाठी विशेष स्नेहभेटीचे आयोजन करून डीबीडी ग्रुपतर्फे एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात येत आहे. सर्व चॅनेल पार्टनर्सनी उपस्थित राहून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, अधिक माहिती व नोंदणीसाठी ७७९६ ९९६६७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.