नाशिक

गावठी कट्ट्यासह एकास अटक

CD
गावठी कट्ट्यासह एकास अटक पाळधी, ता. १५ : धरणगाव व पाळधी पोलिसांनी गिरणा नदीपात्रात संयुक्त कारवाई करीत एका संशयिताला गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. आव्हाणे (ता. जळगाव) येथील आनंदा बळीराम सपकाळे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शोध मोहीम सुरू आहे. यादरम्यान पाळधीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश कोते व पथक दोनगाव शिवारातील नदीपात्रात अवैध वाळू उपशाबाबत तपासणी करीत असताना, संशयित आनंदा सपकाळे याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे २५ हजार रुपयांचा गावठी कट्टा आणि एक काडतूस आढळले. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील पवार, सहायक निरीक्षक गणेश कोते व पथकाने केली. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय बडगुजर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT