नाशिक

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

CD
व्यवस्थापनातील आधुनिक अध्यापन पद्धतीवर मार्गदर्शन गोदावरी ‘आयएमआर’च्या कार्यशाळेचा समारोप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड रिसर्च (आयएमआर), जळगाव आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन शिक्षणाच्या नाविन्यपूर्ण पद्धती’ या विषयावर आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा यशस्वी समारोप झाला. कार्यशाळेत देशभरातील १३० हून अधिक प्राध्यापक, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी प्रा. सुहास पाटोळेकर यांनी भविष्यातील कॉर्पोरेट क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन व्यवस्थापन शिक्षणातील नव्या अध्यापन पद्धतींवर मार्गदर्शन केले. त्यांनतर डॉ. चारुलता कुलकर्णी, डॉ. अर्पित सिंग यांनी सखोल मार्गदर्शन केले. गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळेच्या समारोप सत्रात समन्वयक डॉ. चेतन सरोदे यांनी प्रमुख वक्ते तसेच कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या प्रा. स्मिता चौधरी आणि प्रा. पूनम भारुडे यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईच्या ५,५७५ कोटींच्या मेट्रो प्रकल्पास मंजुरी, राज्य सरकारकडून हिरवा कंदील

भीषण अपघात! बसमधून उरताच ट्रकने उडवलं, चिमुकलीसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर...

Maharashtra Rain Update: मान्सूनची आगेकूच! महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD ची मोठी अपडेट

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांवर जणूकाय देवाचीच कृपा! बोलतील ते होतं खरं, यांच्याशी पंगा घेणाऱ्यांना बसतो मोठा फटका

मुंबई किंवा पुणे नाही तर अनुश्री मानेने 'या' ठिकाणी खरेदी केलंय हक्काचं घर; 'या' कलाकारांनी दिली भेट; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT