अँकर
---
फोटो: 22000
...
‘निमा’ अन् महाराष्ट्र चेंबरचा
संयुक्त कार्याचा निर्धार
--
चेंबरच्या नवनिर्वाचित सदस्यांचा निमातर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : उद्योग-व्यापारासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्यातर्फे संयुक्तरित्या व्यक्त करण्यात आला. निमित्त होते महाराष्ट्र चेंबरच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील विजयी कार्यकारिणी सदस्यांच्या सत्काराचे.
---
उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुनीता फाल्गुने यांची, तर व्यवस्थापन समिती सदस्यपदी वेदांशू पाटील यांची निवड झाली. निमा अध्यक्ष आशिष नहार व कार्यकारिणीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. आशिष नहार म्हणाले, उद्योजक, व्यावसायिक आणि कामगार यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, औद्योगिकसह कृषी मालाच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, दळणवळणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी संयुक्तरित्या प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.
यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, किरण पाटील, विरल ठक्कर, राजेंद्र कोठावदे, कैलास पाटील, रवींद्र झोपे, गोविंद बोरसे, प्रफुल संचेती, दीपाली चांडक, संदीप सोमवंशी, मिथिला कापडणीस, जयश्री कुलकर्णी, महेंद्र बच्छाव, जयंत जोगळेकर, कैलास आहेर, आशुतोष गायकवाड, वासुदेव भगत, राजेश सिंघल, सचिन कंकरेज, किरण वाजे, शशी नवले, नितीन आव्हाड, रवी पुंडे, अनिल मंत्री, दिलीप पिंगळे, वृंदा रावल, आदिती निरगुळे, प्रकाश गुंजाळ, शरद टरले, एन. टी. गाजरे उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.