नाशिक

राज्यस्तरीय बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनस्वी पाटीलला सुवर्ण पदक

CD
NSK26H22138 जळगाव : राज्यस्तरीय बाॅक्सिंग स्‍पर्धेत सुवर्णपदक प्राप्‍त मनस्‍वी पाटील. ––– राज्यस्तरीय बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनस्वी पाटीलला ‘सुवर्ण’ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : येथील खेलो इंडिया बाॅक्सिंग सेंटरची खेळाडू मनस्वी सागर पाटील हिने जळगावात झालेल्या महाराष्ट्र राज्य बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सबज्युनियर गटात सुवर्णपदक पटकाविले. स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीत पुण्याची खेळाडू मृण्मयी शिर्के हिच्या विरुद्ध झालेल्या रोमहर्षक लढतीत तिने हे सुवर्णपदक पटकावले. आपल्या कामगिरीच्‍या आधारावर पंजाब येथे २२ ते २९ जून २०२६ दरम्यान होणाऱ्या पाचव्या सब ज्युनियर राष्ट्रीय बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी मनस्वीने महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले. मनस्वीला प्रशिक्षक सागर जगताप (सातारा) व नीलेश बाविस्कर (जळगाव) यांचे मार्गदर्शन लाभले. या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारी जळगाव जिल्ह्यातून एकमेव खेळाडू आहे. मनस्वी ही सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपशिक्षक सागर पाटील व आर. आर. विद्यालयातील उपशिक्षिका राजश्री भदाणे यांची कन्या आहे. मनस्वीला जिल्हा बाॅक्सिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, पालक व सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी अंतिम संधी

CM Devendra Fadnavis : सरकार दबावाने नव्हे, संविधानानुसार चालते; जीसीसीमध्ये पुणे देशात अव्वल ठरणार

विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, शिक्षकांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आश्रमशाळेतच केला मंत्रोपचार, मेळघाटातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT