नाशिक

‘शासकीय अभियांत्रिकी’च्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे

CD
सीटीबी गौरवगाथा लेख --- NSK26H22285 जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य कॅम्पसचे प्रवेशद्वार. --- NSK26H22286 जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंडस्ट्री-ॲनुमी मीट’अंतर्गत झालेल्या विविध उपक्रमांची एकत्रित दृष्ये. --- NSK26H22288 जळगाव : महाविद्यालयातील आजी- माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीस उपस्थित सध्या विविध क्षेत्रात कार्यरत अभियंते, मान्यवर व पदाधिकारी. --- NSK26H22289 जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका तंत्रज्ञानविषयक उपक्रमात सहभागी विद्यार्थी. --- NSK26H22290 लोगो : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव. --- NSK26H22291 (डॉ. सुहास गाजरे) --- NSK26H22292 (चेतन जाधव) --- तंत्रज्ञान, संस्कृती आणि संस्कारांचा त्रिवेणी संगम उपशीर्षक ‘शासकीय अभियांत्रिकी’च्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे अनोखे स्नेहबंध इंट्रो.. १९९६ मध्ये स्थापित झालेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव या संस्थेस तीस वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेने प्रगल्भतेकडे वाटचाल सुरू केली आहे. या वाटचालीचे साक्षीदार असलेले माजी विद्यार्थी संस्थेचा सातत्याने अभिमानाने विचार करताना दिसतात. या माजी विद्यार्थ्यांची संघटना आताच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजेच पुढील पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय झालीय आणि म्हणूनच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावच्या आजी-माजी विद्यार्थ्यांची ही अनोखी जुळण तंत्रज्ञान, संस्कृती आणि संस्कारांचा एक त्रिवेणी संगम आहे. --- संघटनेचे अध्यक्ष चेतन जाधव, उपाध्यक्ष डॉ. ईश्वर जाधव, सचिव विजय चौधरी, सहसचिव डॉ. वंदना महाजन, कोषाध्यक्ष डॉ. महेश पाटील, सहकोषाध्यक्ष डॉ. स्वप्ना पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. महेश सदावर्ते आणि सर्व पदाधिकारी व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहमतीने संस्थेच्या उत्कर्षासाठी अनेक विकास कार्ये राबवत आहेत. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून राबविला जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल) आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांतील नावीन्यपूर्ण सामंजस्य करार. अध्यक्ष चेतन जाधव यांच्या पुढाकाराने झालेल्या या करारानुसार बीएसएनएलचे ज्येष्ठ इंजिनिअर्स संस्थेत येऊन विद्यार्थ्यांना दूरसंचार संबंधित अद्ययावत माहिती पुरवतात आणि हे विद्यार्थी त्यांच्या केंद्रात जाऊन व्यावहारिक प्रशिक्षण घेतात. सैद्धांतिक आणि नवीनतम व्यावहारिक ज्ञानाचे हे एक स्तुत्य उदाहरण आहे. संस्था तंत्रज्ञानाशी संबंधित असल्याने संस्थेत दर वर्षी ‘टेक कारवां’ या नावाने एक तांत्रिक उत्सव साजरा केला जातो. राष्ट्रीय स्तराच्या या स्पर्धेत भाग घेण्यासाठी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी आपले नावीन्यपूर्ण मॉडेल्स प्रदर्शित करण्यासाठी येथे येतात. या वेळेस आपले कौशल्य दाखविण्याची त्यांची चुरस पाहण्याजोगी असते. तसेच कॉम्प्युटर प्रोग्राम संबंधित ‘हॅकेथॉन’ हा राष्ट्रीय स्तरीय उपक्रम या संस्थेकडून आयोजित केला जातो. भारतभरातून आलेले कॉम्प्युटर अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही विद्या या दरम्यान प्रदर्शित करतात. क्षणाचाही खंड न पडता रात्रंदिवस चालणारा हा एक किंवा दोनदिवसीय सोहळा बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो. या वर्षी संस्थेने ‘हार्डवेअर हॅकेथॉन’सुद्धा सुरू केली. या सर्व कार्यक्रमात प्रकल्प मार्गदर्शक, परीक्षक, बीज भाषण, ई. भूमिकांतून माजी विद्यार्थ्यांची खूप मदत होते. विद्यार्थ्यांचा ड्रोन क्लब संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ड्रोन क्लबची स्थापना केली असून, या क्लबमध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांना पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करतात. माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने या मुलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे IIT च्या माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या ''IIT-PIWOT'' या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान मेळाव्यात या ड्रोन क्लबच्या विद्यार्थ्यांनी दर्शविलेले मॉडेल ड्रोन आकर्षणाचे केंद्र होते. याच प्रदर्शनात माजी विद्यार्थी हितेंद्र वल्हे आणि भाग्येश तजने या माजी विद्यार्थ्यांच्या ecruxbot या स्टार्टअपने तयार केलेला रोबोट खूप लोकप्रिय ठरला. या द्वयीने संस्थेच्या विद्यार्थ्यांकरिता कार्यक्रम घेतलेले आहेत. बंगळुरू येथे आयोजित ''SAI एरोथॉन'' स्पर्धेत भाग घेऊन ड्रोन क्लबच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय स्तरावर पहिल्या पाचमध्ये आपले नाव नोंदवून खानदेशची मान उंच केली. अभिमानाची बाब म्हणजे ड्रोन क्लबच्या दोन विद्यार्थ्यांनी केंद्र शासनास पाठविलेल्या एका प्रस्तावास मान्यता मिळाली असून, केंद्र शासनाकडून त्यासाठी १२ लाख रुपयांचे अनुदान स्वीकृत करण्यात आले आहे. हे सर्व तंत्रज्ञानाच्या नवनवीन वाटांवर मुक्तपणे जाण्यासाठी संस्था आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नांची पोचपावती देतात. ‘एआय’ क्लबची स्थापना तांत्रिक क्षेत्रात आणि एकूणच व्यवहारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता उपयोग लक्षात घेता संस्थेत ‘एआय’ क्लबची स्थापना करण्यात आली असून, यात या विषयातील देशभरातील तज्ज्ञांना पाचारण करून त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात, तसेच विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील खाचाखोचा समजावून देण्यासाठी औपचारिक प्रशिक्षणही दिले जाते. संस्थेचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे हे स्वतः या विषयाचे तज्ज्ञ असल्यामुळे या क्लबतर्फे होणाऱ्या संपूर्ण उपक्रमांमध्ये ते व्यक्तिशः रस घेऊन त्यांची उपस्थिती दर्शवितात. या क्लबचा एक उपक्रम म्हणून, डॉ. सुहास गाजरे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व’ या विषयावर जळगाव आकाशवाणीवरून दिलेले व्याख्यान कायम स्मरणात राहील असे आहे. त्याचप्रमाणे, तरुणांमध्ये ‘एआय’ संदर्भात जागृती व्हावी यास्तव त्यांचे एक सारगर्भित व्याख्यान ‘सकाळ यूथ समीट’दरम्यान नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानादरम्यान तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून येत होता. पारंपरिक भारतीय ज्ञानाची ओळख अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभावानेच शिकवला जाणारा एक विषय म्हणजे भाषा. या संस्थेत द्वितीय वर्षात ‘मराठी लेखन कौशल्य’ हा विषय शिकविला जातो. महाराष्ट्र म्हणजे गड आणि किल्ले आलेच, किंबहुना शिवकालीन गड आणि किल्ले हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्राच्या गडांचे गाढे अभ्यासक माजी विद्यार्थी डॉ. देवदत्त गोखले हा विषय आवडीने शिकवतात व येथील विद्यार्थी त्यांच्या वर्गाची आतुरतेने वाट बघतात. विशेष म्हणजे, या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतून होते. यासोबतच ‘योग आणि पोषण’ आणि ‘पारंपरिक भारतीय ज्ञान’ या विषयांची ओळखही विद्यार्थ्यांना नियमित वर्गांतून करून देण्यात येते. सुवर्णक्षणांची साक्ष, कौटुंबिक मनोमिलन दर वर्षी जानेवारी महिन्यात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा (Alumni Meet) या संस्थेत भरतो. गेल्या २५ वर्षांत या संस्थेतून आपले करिअर घडवून देश-विदेशात कार्यरत असलेले इंजिनिअर्स, आपल्या कुटुंबीयांसोबत जळगावी येऊन आत्मीयतेने हा सोहळा साजरा करतात. याप्रसंगी ज्या विद्यार्थ्यांना येथून उत्तीर्ण होऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा विद्यार्थ्यांचा ‘रौप्य महोत्सवी’ सोहळा इथे साजरा होतो. तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडा, साहित्य आणि संस्कृती यांचाही मेळ हवा हे जाणून घेत, या दोन दिवसांच्या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थी आपले सोनेरी दिवस आठवत, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या संकुलात येऊन धमाल करतात. या वास्तूतील आपले जुने वर्ग पाहून भावुक होणारे प्रगल्भ इंजिनिअर बघून ‘यांची नाळ या वास्तूशी कायमची जोडली गेली आहे’ हे निर्विवाद पटते. कविता, गाणी आणि खेळ यांनी परिपूर्ण त्यांचे या संकुलातील दोन दिवसांचे वास्तव्य त्यांना वर्षभराची ऊर्जा देऊन जाते. कौशल्यपरिपूर्ण अभियंते संस्थेतर्फे चालविला जाणारा अजून एक नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजे ‘ब्रेन क्लिनिक.’ याद्वारे मेंदूचे कार्य, त्याची क्षमता वाढवणे आणि मानसिक शांती मिळविण्यासाठी काय करावे, याचा अभ्यास केला जातो. २०२४ मध्ये #KeepInnovatingEveryDay, २०२५ मध्ये #ReimagineEngineeringWithAI आणि २०२६ चे #BecomeCognitivelyPlasticEngineer हे प्राचार्यांनी दिलेले ‘हॅशटॅग’ संस्थेच्या उपक्रमांचे दिशादर्शक आहेत. दर वर्षीचे नवनवे हॅशटॅग वापरून संस्कारित विद्यार्थी जेव्हा तंत्रज्ञानाशी जोडले जातात तेव्हा त्यांची पाळेमुळे त्यांच्या कळत-नकळत येथे अधिक घट्ट रुजत जातात. आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारीवर्ग यांच्या सक्रिय सहकार्याने ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे आणि म्हणूनच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावच्या आजी-माजी विद्यार्थ्यांची ही अनोखी जुळण तंत्रज्ञान, संस्कृती आणि संस्कारांचा एक त्रिवेणी संगम आहे. या प्रयत्नांना २०१४ पासून स्वायत्तता मिळाल्यापासून नियामक मंडळाचे अध्यक्ष अशोक जैन आणि आतापर्यंतच्या सर्व नियामक मंडळाच्या सदस्यांचे भरपूर आशीर्वाद आहेतच. या सर्वांच्या प्रयत्नांतून संस्थेचे ध्येयवाक्य “Globally Accepted Engineers with Human Skills” अर्थात “जागतिक स्तरावर स्वीकारार्ह कौशल्यपरिपूर्ण अभियंते” फलश्रुत होताना दिसत आहे, यात शंका नसावी! --- कोट शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण बनवत नसून भाषा आणि भारतीय परंपरेबाबतही ज्ञानार्जन केले जात आहे. याप्रकारच्या उपक्रमांचे सर्व स्तरावर कौतुकही होतेय. आजी- माजी विद्यार्थ्यांची संघटना महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे योगदान देतेय. - चेतन जाधव, अध्यक्ष, आजी- माजी विद्यार्थी संघटना, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव --- (संबोधन : प्राचार्य डॉ. सुहास गाजरे, शब्दांकन : डॉ. श्रीकांत तारे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

IPL 2027 Trade: आयपीएल इतिहासातील High-Profile डिल! रिषभ पंत १२ कोटींचा तोटा सहन करून 'या' संघाच्या ताफ्यात, कुलदीप यादव LSG कडे

MSRTC Employees DA Hike : एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत वाढवला; मंत्री सरनाईकांची माहिती

SCROLL FOR NEXT