स्वतः भोवतीच्या मर्यादा ओलांडणे म्हणजे मुक्त होणे
उपशीर्षक
धनंजय गोखले : ‘आवडीनिवडीचे जग’ विषयावर कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : माणवाला ऊर्जा बाह्य स्रोतांमधून मिळते, पण ती अंतर्मनातूनही मिळू शकते. हा महत्त्वपूर्ण विचार मांडत प्रत्येक व्यक्तीची उत्तरे त्याच्या स्वभावानुसार वेगळी असली तरी ऊर्जा बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही स्रोतांमधून मिळू शकते. स्वतःभोवती आपण निर्माण केलेल्या मानसिक मर्यादा ओलांडणे म्हणजेच खऱ्या अर्थाने मुक्त होणे, असा संदेश धनंजय गोखले यांनी दिला.
रोटरी क्लब जळगावच्या वतीने पुणे येथील व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ धनंजय गोखले यांच्या आवडीनिवडीचे जग– माणसांची नवी आनंदी ओळख या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात मार्गदर्शन करताना गोखले बोलत होते. गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये रविवारी झालेल्या कार्यशाळेप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, प्रोजेक्ट चेअरमन कमलेश चांदवाणी यांची उपस्थिती होती.
मानवी स्वभाव, व्यक्तिमत्त्वातील विविधता आणि परस्परसंबंध यांचा वेध घेणाऱ्या या कार्यशाळेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेत वक्तशीर असणे आणि वेळेवर काम पूर्ण करणे यातला सूक्ष्म फरक स्पष्ट करण्यात आला. काहीजण लवचिकता व उत्स्फूर्ततेला प्राधान्य देतात. स्वभावातील या भिन्नता योग्य- अयोग्य नसून प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण दर्शवतात. या भिन्नता समजून घेणे म्हणजेच माणसांची नवी आणि आनंदी ओळख करून घेणे असल्याचे श्री. गोखले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.