नाशिक

महायुतीत माझा विश्‍वासघात झाला : दराडे

CD
महायुतीत माझा विश्‍वासघात झाला पराभूत उमेदवार दराडे यांनी फोडले खापर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला. दराडे यांनी पराभवाचे खापर महायुतीवर फोडले असून, माझा विश्‍वासघात झाल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. महायुतीच्या मतदारांनी आमच्याकडून पैसे घेऊन आमच्याविरोधात मतदान केल्याची टीका दराडेंनी केली. पराभवाबाबत पक्षश्रेष्ठी तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या कानावर संपूर्ण प्रकार घालणार असल्याचे दराडे यांनी या वेळी स्पष्ट केले. विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २२) पार पडलेल्या मतमोजणीत अपक्ष गोकुळ गिते यांनी शिवसेना-महायुतीचे उमेदवार दराडे यांना धोबीपछाड दिली. गिते यांनी तब्बल १०९ मतांनी दराडेंचा पराभव केला. मतमोजणीत पहिल्याच फेरीत पराभव स्पष्टपणे दिसून आल्याने दराडे यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. या वेळी दराडे यांनी पराभवाचे विश्‍लेषण करताना महायुतीवर खापर फोडले. निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून आपण लढलो. मात्र महायुतीमध्येच आपला विश्‍वासघात झाल्याची सल दराडे यांनी बोलून दाखविली. दरम्यान, दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी पराभवाचे विश्‍लेषण करताना महायुतीमधील घटक पक्षांवर आम्ही ज्या अपेक्षेने विश्वास ठेवला होता, तसे मतदान झाले नाही. निवडणुकीत शिवसेनेचा शंभर टक्के विश्‍वासघात झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपची २०० मते आणि शिवसेनेची १७० मते होती. उर्वरित मते महाविकास आघाडी व इतरांची होती. समोरच्या उमेदवाराची आकडेवारी पाहता महायुतीमध्ये दगाफटका झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे मत कुणाल दराडे यांनी व्यक्त केले. वाद अन्‌ मध्यस्थी... जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी आठ पासून मतमोजणीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी सकाळी सात ते साडेसात या कालावधीत नरेंद्र दराडे आणि गोकुळ गिते यांचे मतदान प्रतिनिधी कार्यालयात दाखल झाले. या वेळी दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांसमोर आल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वादावादीदेखील रंगल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील वाद निवळला. दराडेंच्या कन्या भावुक निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसून आल्यानंतर नरेंद्र दराडे व त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामधून काढता पाय घेतला. या वेळी दराडे यांच्या कन्या प्रियंका दराडे भावुक झाल्याचे दिसून आल्या. या वेळी प्रियंका दराडे यांनी प्रतिक्रिया देताना महायुतीने आमचा पराभव केल्याचा आरोप केला. तसेच सर्व जण विश्‍वासघातकी असल्याची टीका करतानाच त्यांना अश्रू अनावर झाले. आमदार दराडेंची जीभ घसरली बंधू नरेंद्र दराडे यांच्या पराभवानंतर आमदार किशोर दराडे संतप्त झाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत असताना गोकुळ गिते समर्थकांकडून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी आमदार दराडे यांनी वाहनातून उतरून संताप व्यक्त केला. संतापाच्या भरात दराडे यांची जीभ घसरली व त्यांनी गिते समर्थकांना शिवीगाळ केली. सरतेेशेवटी कार्यकर्त्यांनी दराडेंची समजूत काढत त्यांना घटनास्थळावरून रवाना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

Crime News: कोर्याची सीमा! मामानं ९ महिन्यांच्या भाचीला घरातून उचलून नेलं, नंतर घडवलं घृणास्पद कृत्य; शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आढळली

Latest Marathi News Live Update : कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट

बाप-लेकीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी! 'फादर्स डे'ला रिलीज झाला 'द्विधा' चित्रपटाचा टिझर; 'या' दिवशी येणार भेटीला!

SCROLL FOR NEXT