नाशिक

ढगाळ वातावरण, पावसाची प्रतिक्षा

CD
जळगाव जिल्ह्यातील काही भागांत तुरळक पाऊस (उपशीर्षक) दिवसभर ढगाळ वातावरण; हवामानातील बदलाने उकाड्यात वाढ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ ः जिल्ह्यात उन्‍हाचा तडाखा कायम आहे. सोमवारी (ता. २२) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. दुपारी साडेतीननंतर जळगाव शहरासह काही भागात पावसाचे आगमन झाले. मात्र, पेरणीयोग्‍य पाऊस नसल्‍याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जूनअखेर आला असतानाही पाऊस न आल्याने सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. खरीप हंगामाची बहुतांश तयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी मशागत, बियाणे आणि खतांची व्यवस्था करून ठेवली आहे. मात्र, पावसाअभावी पेरणी रखडली आहे. काही भागात शेतकऱ्यंनी लागवड करून ठेवली आहे. शेतकऱ्यांना पावसाची आस आहे. ऊन-सावल्‍यांचा खेळ रात्रीपासूनच वातावरणात बदल झाला होता. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सूर्याची तीव्रता काहीशी कमी होती. सकाळी काही भागात तुरळक पाऊस झाला. हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाडा आणि घामाच्या धारांचा त्रास कायम आहे. दुपारी दमट वातावरणामुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवत होती. दिवसभर ऊन-सावल्‍यांचा खेळ सुरू राहिल्‍यानंतर दुपारी साडेतीनच्‍या सुमारास शहरासह आजूबाजूच्‍या परिसरात तुरळक पाऊस झाला. दुसरीकडे ऊनही पडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT