NSK26H22219
नंदुरबार : आदर्श गाव संकल्पना राबविण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात बोलताना स्वदेस फाउंडेशनचे दीपक गिऱ्हे, विलास पावरा. शेजारी सुहास नाईक व मान्यवर.
---
आदर्श गाव संकल्पनेसाठी आराखडा
स्वदेस फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली गावविकास उपक्रमाला गती
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २२ : सातपुड्यात आदर्श गाव संकल्पना रुजविण्यासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार केला जात आहे. मुंबईच्या स्वदेस फाउंडेशन या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ, माळ या गावांच्या परिसरात हा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी सहभागी गावांचा सूक्ष्म नियोजन आराखडा तयार केला जात आहे. माळ, खुर्चीमाळ गटग्रामपंचायत येथे स्वदेस फाउंडेशन अंतर्गत क्रांतिवीर खाज्या नाईक गाव विकास समिती स्थापन करण्यात आली आहे. गावात स्वच्छता करण्यात आली. घरोघरी शोषखड्डे तयार करून गावाचे सुशोभीकरण करण्यात आले. स्वदेस फाउंडेशनच्या मार्गदर्शनात तीन महिने श्रमदान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य नातेश, स्वदेस फाउंडेशनचे दीपक गिऱ्हे, विलास पावरा, भूषण बुनकर, माळ गटग्रामपंचायतीच्या सरपंच बिंदूबाई नाईक, ग्रामपंचायत अधिकारी दिवाकर पाडवी, तलाठी दिनेश पावरा, कृषी सहायक कैलास ठाकरे, वनरक्षक सचिन वाघ, खुर्चीमाळ पोलिसपाटील लक्ष्मण नाईक, क्रांतिवीर खाज्या नाईक समितीचे अध्यक्ष हरिदास नाईक व समिती सचिव शर्मिलाबाई नाईक, खजिनदार दिनाबाई नाईक, गावकारभारी नानसिंग नाईक व गणेश बुधावल गावाचे माजी सरपंच मंगलसिंगदादा, रामपूर गावाचे सरपंच दीपक, ग्रामपंचायत जमाना येथील लोकनियुक्त सरपंच, रतनपाडा गावाचे आदर्श पोलिसपाटील राजेंद्र तडवी, अलिविहीर गावाचे आदर्श पोलिसपाटील गौतमसिंग पाडवी, पोलिस अज्ञेश गावित, सामाजिक कार्यकर्ते अनिल वसावे, तसेच माळ, खुर्चीमाळ डोंगरीपाडा, सोजरबार पाडा येथील मुख्याध्यापक, उपशिक्षक, आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविका, मदतनीस व ग्रामस्थांनी एकत्र येऊन संबंधित कार्यक्रम पार पाडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.