नाशिक

गुरुवर्य प. वी. पाटील विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

CD
NSK26H22131 जळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगावात सामूहिक योगाभ्यास करताना साधक. --- NSK26H22106 हास्य परिवारातर्फे योगासने करताना सदस्य. ------------- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास शहरातील शाळा, महाविद्यालयांसह विविध संस्थांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (ता. २१) शहरातील शाळा, महाविद्यालयांसह विविध संस्थांतर्फे सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. यावेळी योग शिक्षक व तज्ज्ञांकडून मार्गदर्शनासह प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि ‘मेरा युवा भारत, जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, योग प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा योग प्रशिक्षक चंचल माळी यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करून उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. आवश्यक सुधारणा आणि प्रलंबित उणिवा तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. --- हास्य परिवारातर्फे योगादिन केसीइ इंजिनिअरिंग कॉलेज व हास्य परिवारातर्फे योगासनाचा कार्यक्रम झाला. प्राचार्य सुगंधी, हास्य परिवाराचे प्रमुख अश्विन गांधी यांनी मार्गदर्शन केले. योगशिक्षक अनिता पाटील व योगशिक्षक सुरेश महाजन यांचा सत्कार झाला. प्रा. मुरलीधर चौधरी यांनी प्रास्ताविक केले. योगशिक्षक पाटील यांनी योगासने प्रात्यक्षिके प्राणायाम व त्याबाबतची माहिती दिली. सर्वांकडून सूर्यनमस्कार करून घेतले. रामदेव बाबा पतंजलीचे राजू भय्या यांनी भजन सादर केले. हास्य परिवार ज्येष्ठ सदस्य राजू कुलकर्णी यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. --- गुरुवर्य प. वी. पाटील विद्यालय केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिरात मुख्याध्यापिका धनश्री फालक यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्ष तथा विश्वमंगल योग निसर्गोपचार केंद्राच्या संचालिका प्रा. चित्रा दिलीप महाजन आणि मिरॅकल निसर्गोपचार केंद्राचे संचालक व योगशिक्षक रोहन विकास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका कल्पना तायडे व शिक्षक दीपक पाटील यांनी केले. कल्पना तायडे यांनी सूत्रसंचालन केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पबवर पहाटे ३ वाजता पोलिसांची धाड, सुरू होता धक्कादायक प्रकार; ८० ते १०० तरुण तरुणी ताब्यात

Satej Patil Dhananjay Mahadik : बंटी पाटील-मुन्ना महाडिक तब्बल १२ वर्षांनी एकत्र; डी. वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा, सतेज-संजय पाटील यांचे कौतुक

Indian Air Force Office: पाकच्या ‘हनीट्रॅप’मध्ये हवाई दलाचा अधिकारी; लष्कराची माहिती पाकिस्तानला दिली

Marathi News Live Updates : धबधब्यात दगडांवरून पाय घसरून पडला, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT