टुडे १, मेन (या बातमीला दुसरी बातमी क्लब करावी)
-----
निकालाचे फोटोफिचर.
NSK26H22227 (हा फोटो मोठा वापरावा)
जळगाव : विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा गुलाल उधळून जल्लोष करताना कार्यकर्ते.
-------------
NSK26H22226
भाजपचा झेंडा घेऊन जल्लोष करताना कार्यकर्ते.
----
NSK26H22222
जळगाव : अल्पबचत भवनात सुरू असलेली मतमोजणी.
----
NSK26H22223
प्रवेशद्वारावर असलेला पोलिस बंदोबस्त.
----
NSK26H22228
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे बाहेर पडताना.
-------------
NSK26H22230
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना नंदकिशोर महाजन. सोबत आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, दीपक सूर्यवंशी आदी.
---
जळगावात ‘मविआ’ची सुमारे ४० मते फुटल्याचा दावा
उपशीर्षक
महायुतीचे एकतर्फी वर्चस्व; शरद तायडेंना स्वपक्षाची पूर्ण मते नाहीत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकार मतदारसंघातील निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप- महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांनी दणदणीत विजय मिळवला. महाजनांच्या विजयात महायुतीच्या साडेचारशे मतांसह अपक्षांची गोळाबेरीज करुनही त्यांना मिळालेल्या मतांचा विचार करता महाविकास आघाडीची सुमारे ४० मते फुटल्याचा दावा केला जात आहे. शरद तायडेंना त्यांच्या पक्षाचीही पूर्ण मतेही मिळू शकली नाहीत.
दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता.२२) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील अल्पबचत भवनात पार पडली. अधिकृत निकाल घोषित होण्याआधीच भाजपने जल्लोष सुरू केला. विजयी उमेदवार नंदकिशोर महाजन कार्यकर्त्यांसह सकाळीच मतमोजणी स्थळी पोहोचले होते. निकाल जाहीर होताच विजयी मुद्रेसह महाजन व कार्यकर्ते बाहेर आले. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह आमदार मंगेश चव्हाणांना खांद्यावर घेत जल्लोष केला.
१४-२
अवैध मतपत्रिकांवर आक्षेप
घेत तायडेंचा ‘वॉक आउट’
विधान परिषद निवडणुकीसाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातील ७ केंद्रांवर १८ जूनला मतदान झाले होते. ६३० पैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी आठला मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. सुरवातीला सर्व मतांची पडताळणी करुन अवैध ५ मते बाजूला काढण्यात आली. ‘मविआ’चे उमेदवार शरद तायडे यांनी अवैध मतपत्रिकेचा मुद्दा उपस्थित करून त्यावर आक्षेप घेतला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रोहन घुगे यांनी त्यांचा आक्षेप खोडून काढला व मतमोजणी सुरू केली. त्यामुळे शरद तायडेंनी यंत्रणेचा निषेध करत तेथून काढता पाय घेतला.
प्रतिस्पर्ध्यांची अनामत जप्त
६११ वैध मतांची मोजणी करायची असल्याने विजयासाठी ३०६ मतांचा आवश्यक कोटा निश्चित करण्यात आला. नंदकिशोर महाजनांना पहिल्या पसंतीची तब्बल ५८२ मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार शरद तायडेंना केवळ १७ मतेच मिळू शकली. अनिल चौधरींना ११ व रेश्मा काळेंना केवळ १ मत मिळाले. अर्थात, या दोघांनीही महाजनांना ऐनवेळी पाठिंबा जाहीर केला होता.
------
तायडेंना ‘मविआ’ची मतेही नाहीत
शरद तायडेंकडे त्यांच्या स्वत:च्या पक्षाची १९ मते होती. शिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाची २९ व कॉंग्रेसची २२ अशी एकूण ७० मते मविआकडे होती. त्यापैकी चाळीसगावातील १२ मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. ती मते, मविआची असल्याचे सांगितले जाते. तरीही उर्वरित ५८ मतांपैकी तायडेंना केवळ १७ मतेच मिळाली. भुसावळमधील नगराध्यक्षांचे एक मत बाजूला केले तर जवळपास ‘मविआ’ची ३८ ते ३९ मते फुटल्याचा दावा आता केला जात आहे.
-----
ग्राफिक्स
मतदारसंख्या दृष्टिक्षेपात
एकूण नगरसेवक : ५७४
स्वीकृत सदस्य : ५६
एकूण सदस्य/ मतदार : ६३०
----
पक्षनिहाय सदस्य
भाजप : २५२
शिवसेना : १८६
राष्ट्रवादी कॉंग्रेस : ३५
काॅंग्रेस : २२
शिवसेना (उद्धव ठाकरे) : १९
राष्ट्रवादी (शरद पवार) : २९
इतर अपक्ष : ८७
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.